मराठमोळ्या अंदाजात साजरा झाला शिवरायांचा जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:27 PM2021-02-19T16:27:46+5:302021-02-19T16:29:44+5:30

नागपूर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही मराठमोळ्या पद्धतीने अभिवादन करून शिवसैनिकांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. शुक्रवारी सकाळपासूनच मावळ्याच्या वेशातील शिवसैनिकांची लगबग सुरू होती. लहानग्या शिवबाचे रुप धारण करण्यापासून ते मावळवेषातील तरुणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. (सर्व छायाचित्रे-राजेश टिकले)

नागपुरातील शिवाजी नगरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन करून माल्यार्पण केले. मावळ्याच्या वेषातील तरुणांनी व पारंपारिक वेषभूषेतील स्त्रियांनी शिवरायांना शिवकालीन रिवाजाने अभिवादन केले. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.