'कहीं तो होगा'च्या कशिशचा कायापालट पाहून चाहते झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 23:01 IST2019-04-27T22:54:52+5:302019-04-27T23:01:11+5:30

छोट्या पडद्यावरील कहीं तो होगा मालिकेतून प्रसिद्ध झालेली आमना शरीफ सध्या सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या मालिकेत आमनाने कशिशची भूमिका निभावली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.
या मालिकेनंतर आमना होंगे जुदा ना हम आणि नायिका यासारख्या मालिकेत काम केले आहे.
जवळपास दहा वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत राहिल्यानंतर आमनाने 2013 साली करियरमधून ब्रेक घेतला होता.
त्यानंतर आमनाने तिचा बॉयफ्रेंड अमित कपूरसोबत हिंदू धर्माचा स्वीकार करून लग्न केले होते.
शेवटची ती 2014 साली एक व्हिलेन चित्रपटात दिसली होती.
या चित्रपटात आमनाने रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका केली होती.
आमना लवकरच जान्हवी कपूर व राजकुमार राव यांच्यासोबत रुह आफजा चित्रपटात दिसणार आहे.