Birthday Special : जेनिफर विंगेट झाली ३४ वर्षांची, टिव्हीनंतर डिजिटल माध्यमात पदार्पणासाठी झाली सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:46 PM2019-05-30T18:46:11+5:302019-05-30T18:50:19+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जेनिफर विंगेटचा आज वाढदिवस असून ती ३४ वर्षांची झाली आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याबद्दल काही खास गोष्टी

जेनिफरचा जन्म ३० मे, १९८५ साली महाराष्ट्रात झाला.

जेनिफरचे वडील हेमंत विगेंट रिलायन्स इंडस्ट्रीत कार्यरत होते. तिच्या आईचे नाव आहे प्रभा विगेंट.

२०१२ साली जेनिफरने दिल मिल गए मालिकेतील सहकलाकार करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले होते.

मात्र, २०१४ साली जेनिफर व करण सिंग ग्रोव्हर विभक्त झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे.

जेनिफरने आपल्या करियरची सुरूवात वयाच्या बाराव्या वर्षी केली होती. तिने राजा को रानी से प्यार हो गया या चित्रपटातून पदार्पण केले होते.

त्यानंतर जेनिफर वयाच्या १४व्या वर्षी कुछ ना कहोमध्ये पहायला मिळाली होती.

छोट्या पडद्यावरील व चित्रपटात काम केल्यानंतर आता जेनिफर डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. कोड एम असे या वेबसीरिजचे नाव आहे. ही ऑल्ट बालाजीची वेबसीरिज आहे.