By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:42 IST
1 / 7मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने जिल्ह्यातील महिलांची डोकेदुखी वाढली आहे. ई- केवायसीची प्रक्रिया करताना प्रश्नांच्या अज्ञानामुळे जिल्ह्यात जवळपास ६० हजारांहून अधिक महिलांना चुकीचा पर्याय निवडल्याने दरमहा मिळणाऱ्या दीड हजाराच्या अनुदानाला मुकावे लागले आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावर प्रयन्न करून पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. ई-केवासयी केल्यानंतरही रक्कम नाही आली. लाडक्या बहिर्णीची कुठे चूक झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे.2 / 7दुरुस्तीस पर्यायच नाही - एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर त्यात सुधारणा करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. चूक लक्षात आल्यानंतरही दुरुस्त करता येत नाही.3 / 7ई-सेवा केंद्र आणि ऑपरेटरचा गोंधळ - जिल्ह्यातील अनेक ई-सेवा केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत आणि वेळेअभावी ऑपरेटरने महिलांना नीट न विचारता स्वतःच्या मनाने माहिती भरली असल्याचा संशय आहे.4 / 7महिला व बालविकास विभागात चकरा - लाडकी बहिणी योजनेत ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय भरला आहे. अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थी आयसीडीमध्ये चकरा मारतात.5 / 7कागदपत्रे अपलोड न केल्याचा फटका - अनेक महिलांनी ई-केवायसी करताना केवळ माहिती भरली. मात्र, आवश्यक असलेली मूळ कागदपत्रे (उदा : उत्पन्न दाखला, हमीपत्र) स्पष्टपणे अपलोड केली नाहीत. 6 / 7आता दाद मागायची कुठे? - माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत होती. यावर दाद कुठे मागायची हा खरा प्रश्न आहे.7 / 7ई-केवायसी करताना महिलांना या चुका नडल्या - कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत आहेत काय? या प्रश्नावर पर्यायाची निवड करताना अनेकांनी चुका केल्या. कुटुंबात सरकारी नोकरी नसतानाही होय असा पर्याय निवडला. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न नोंदविताना चुका करण्यात आल्या. कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत तर नाही ना? या प्रश्नावर पर्यायाची निवड करताना अनेक लाभार्थीचा गोंधळ उडाला. कुटुंबातील इतर लाभार्थी नसतानाही लाभ घेत असल्याचे दर्शविले गेले.