Era Pawar: कोण आहेत इरा पवार, शरद पवारांशी नातं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:53 IST2025-01-08T20:47:34+5:302025-01-08T20:53:03+5:30
Who is Era Pawar: पवार कुटुंबातील सदस्य असलेल्या इरा पवार यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी त्यांच्याबद्दल ट्विट केले आहे.

काही दिवसांपासून पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीतील एका नावाची चर्चा होत आहे. त्या आहेत इरा पवार! खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याबद्दल ट्विट केलं होतं.
सुप्रिया सुळे यांच्यानंतर युगेंद्र पवार यांनी काही फोटो पोस्ट करत इरा पवारांचं अभिनंदन केलं.
त्यांनी बारामतीत मॅकडोनाल्ड आउटलेट सुरू केलं आहे. त्याच्या नव्या व्यवसायाचं पवार कुटुंबीयांकडून कौतुक केलं जात आहे.
इरा पवार या आमदार रोहित पवार यांची चुलत बहीण आहेत. म्हणजेच राजेंद्र पवार यांचे भाऊ रणजीत पवार यांच्या कन्या.
इरा पवार या शरद पवार यांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांची नात आहे.
इरा पवार यांच्या वडिलांचे नाव रणजीत पवार, तर आईचे नाव शुभांगी पवार आहे.