हे आहेत राज्यातील टॉप ५ श्रीमंत खासदार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 21:15 IST2019-05-28T21:12:10+5:302019-05-28T21:15:34+5:30

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या संस्थेने राज्यातील ४८ खासदारांची आर्थिक परिस्थितीचा अहवाल तयार केलाय. यामध्ये राज्यातील टॉप ५ श्रीमंत खासदारांची माहिती आहे, या पहिलं नावं आहे सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले त्यांची संपत्ती आहे १४० कोटी रुपये
दुसऱ्या नंबरवर आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, संपत्ती आहे १२७ कोटी रुपये
तिसऱ्या नंबरवर आहेत माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्यांची संपत्ती आहे १०२ कोटी रुपये
चौथ्या क्रमांकावर आहेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, त्यांची संपत्ती आहे ६२ कोटी रुपये
पाचव्या क्रमांकावर आहेत भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे भाजपाचे खासदार सुनील मेंढे, त्यांची संपत्ती आहे ४१ कोटी रुपये