गॅस दरवाढ थांबवा नाहीतर खुर्च्या खाली करा, सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 18:12 IST2017-11-03T18:09:11+5:302017-11-03T18:12:23+5:30

गॅस दरवाढीने गृहिणींचे किचन बजेट कोलमडून पडले आहे.
मोदी सरकारने अनुदानित गॅसच्या दरात ४. ५६ रुपये तर विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात तब्बल ९३ रुपयांची वाढ करून देशभरातील महिलावर्गांना महागाईने होरपळून काढले आहे.
या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने नगरसेविका सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली .
महिलांना चुली वाटून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.
दरम्यान गॅस नको आता चुलचं द्या आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांना देण्यात आले.
वापस करो , वापस करो , पुराणे दिन वापस करो , नही चाहिये, नही चाहिये , मोदी के अच्छे दिन नही चाहिये, बहोत हुई फेकू कि बात , अब हम देंगे एक एक लाथ आदी भाजप सरकारविरोधी घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली.