शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 08:12 PM2018-01-20T20:12:25+5:302018-01-20T20:20:18+5:30

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा यवतमाळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी अडविला.

भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या निवासस्थानी जाताना अचानक कार्यकर्ते आडवे आले.

विनोद तावडे यांनी वाहनातून उतरून कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या आणि मागण्या विनोद तावडेंसमोर मांडल्या. तावडेंनीही त्यांची समजूत काढली.