दिवाळी पाडव्यानिमित्त सजले पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गाभाऱ्यात करण्यात आली फुलांची सुरेख आरास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 08:40 AM2020-11-16T08:40:50+5:302020-11-16T09:11:08+5:30

Pandharpur Vitthal-Rukmini Mandir News : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवाळी पाडव्याचे निमित्त साधून फलांची सुरेख आरास करण्यात आली आहे.

आज दिवाळी पाडव्याचे निमित्त साधून राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे आजपासून सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे. दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवाळी पाडव्याचे निमित्त साधून फलांची सुरेख आरास करण्यात आली आहे.

दिवाळी पाडव्यानिमित्त विठुमाऊलीच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली फुलांची सुरेख आरास.

दिवाळी पाडव्यानिमित्त रखुमाईच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली फुलांची सुरेख आरास.

पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

कोविडच्या नियमांमुळे मोजक्याच भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे भाविकांना विठुमाऊलीला पदस्पर्श करता येणार नाही.

फुलांच्या सुरेख आराशीमुळे अधिकच खुललेले विठुमाऊलीचे साजिरे सुंदर रूप

रखुमाईच्या गाभाऱ्यातील आरास