अंगणवाडी सेविकेची नर्मदा परिक्रमा; १८ किमी नाव चालवून ती पोहोचते कर्तव्यावर

By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 02:42 PM2020-11-23T14:42:15+5:302020-11-23T14:50:57+5:30

Maharashtra News : २७ वर्षीय रेलू वासवे अंगणवाडी सेविका असून, त्या दररोज सुमारे १८ किमी अंतर पार करून आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होतात.

कर्तव्याला प्राधान्य देणारी माणसे तशी विरळाच अशीच एक कर्तव्यपरायण व्यक्ती आहेत रेणू वासवे. २७ वर्षीय रेलू वासवे अंगणवाडी सेविका असून, त्या दररोज सुमारे १८ किमी अंतर पार करून आपल्या कामाच्या ठिकाणी हजर होतात. दोन मुलांच्या आई असलेल्या रेलू ह्या आदिवासी मुले आणि गर्भवती महिलांची मदत करण्यासाठी ही वेगळ्या पद्धतीची नर्मदा परिक्रमा करतात.

रेलू ह्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक आदिवासी गाव असलेल्या चिमलखाडी येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. रेलू यांना या गावात येण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांनी नावेच्या मदतीने आदिवासी मुले आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला.

त्या सांगतात की, साधारणपणे आदिवासी महिला, गर्भवती आणि मुले आपल्या कुटुंबासह आमच्या केंद्रात येत असत. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी येणं बंद केलं. अशा परिस्थितीत मी स्वत:च मुले आणि महिलांपर्यंत भोजन पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

रेलू यांचे काम सहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिलांचे आरोग्य आणि वाढीवर लक्ष ठेवण्याचे आहे. त्या त्यांच्या वजनाची तपासणी करतात आणि त्यांना सरकारकडून देण्यात येणारा पोषण आहार देतात. २५ नवजात आणि कुपोषित बालकांसह सात गर्भवतींना योग्य पोषण मिळावे यासाठी रेलू एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातील पाच दिवस नावेच्या माध्यमातून १८ किलोमीटरचा प्रवास करतात.

मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर नर्मदा नदीच्या दुसऱ्या टोकावरील दोन भागांतील आदिवासींनी अंगणवाडीमध्ये येणे बंद केले. अशा परिस्थितीत लहानपणी पोहणे आणि रोईंगमध्ये हातखंडा मिळवणाऱ्या रेलू यांनी नावेच्या माध्यमातून आदिवासींकडे पोहोचण्याचा निर्णय घेतला.

रेलू यांनी आपल्या कामासाठी एका मच्छिमाराकडून नाव उधार घेतली. त्यानंतर नावेच्या माध्यमातून हेमलेट्स अलीघाट आणि दादरचा प्रवास केला. २७ वर्षीय रेलू वासावे सांगतात, दररोज एवढ्या लांब जाणे कठीण आहे. मात्र मुले आणि गर्भवतींनी पौष्टिक भोजण खाणे तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे.

रेलू सकाळी ७.३० वाजता अंगणवाडीत पोहोचतात आणि दुपारपर्यंत तिथे काम करतात. दुपारी भोजन केल्यानंतर एका तासानंतर त्या आपली नाव घेऊन वाड्यांमध्ये जातात. त्या आपल्यासोबत भोजन आणि मुलांचे वजन करण्यासाठीची उपकरणे घेऊन जातात. नावेच्या माध्यमातून नदी पार केल्यानंतर त्या डोंगराळ भागात पायी जातात.