मुंबई-गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण; प्रवाशांना होतोय मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 23:11 IST2019-09-09T23:09:15+5:302019-09-09T23:11:02+5:30

कोकणात प्रवासासाठी मुंबई-गोवा हा एकमेव महामार्ग आहे, त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. आता पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांचा हा प्रवास खडतर होत आहे.
महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडत असून स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गाच्या दुरवस्थेवर छायाचित्राद्वारे प्रकाश टाकला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद अष्टिवकर, सिकं दर अनवरे, गिरीश गोरेगावकर, सुनील बुरूमकर, प्रकाश कदम, गणेश चोडणेकर यांनी.