सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, बॉयफ्रेंडने मरण्यासाठी सोडले रस्त्यावर, कोण आहे प्रिया सिंह?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 07:52 PM2023-12-16T19:52:23+5:302023-12-16T19:56:31+5:30

Who is Priya Singh: एका २६ वर्षीय तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडवर तिला कारखाली चिरडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंडची ओळख अश्वजित गायकवाड अशी पटवली आहे. त्याने त्याचे दोन मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांच्या सांगण्यावरून तिला कारची धडक देऊन उडवल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी एमएसआरडीसीच्या जॉईंट एमडींचा मुलगा आहे.

एका २६ वर्षीय तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडवर तिला कारखाली चिरडल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंडची ओळख अश्वजित गायकवाड अशी पटवली आहे. त्याने त्याचे दोन मित्र रोमिल पाटील आणि सागर शेळके यांच्या सांगण्यावरून तिला कारची धडक देऊन उडवल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी एमएसआरडीसीच्या जॉईंट एमडींचा मुलगा आहे.

तर पीडित तरुणीचं नाव प्रिया सिंह असून, तिने तिचा बॉयफ्रेंड आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असलेल्या अश्वजित गायकवाड याच्यावर तिला जिवे मारण्याचा आरोप केला आहे.

२६ वर्षीय प्रिया ही पेशाने इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि ब्युटिशियन आहे. ती आरोपीसोबत साडेचार वर्षांपासून नात्यामध्ये होती. मात्र हल्लीच तिला गायकवाड याच्या विवाहाविषयी माहिती मिळाली होती.

प्रिया सिंह हिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर ११ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्रिया हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमधून तिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यात तिला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

कासारवडवली पोलिसांनी सोमवारी प्रिया हिच्या तक्रारीवरून भादंवि कलम २७९, ३२३, ३३८, ५०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे.

प्रिया ही चार वर्षांपासून गायकवाड याच्यासोबत नात्यामध्ये होती. तसेच हल्लीपर्यंत ती त्याच्या विवाहापासून अज्ञात होती. जेव्हा प्रिया हिला याबाबत समजले, तेव्हा गायकवाडने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.