शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंद्रपूरमधील 'जंगलबुक' ठरलं देशात पहिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:10 AM

1 / 8
महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्टेशनांनी रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
2 / 8
या स्पर्धेत बिहारच्या मधुबनी स्थानकाने दुसरा क्रमांक पटकावला.
3 / 8
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं या दोन्ही स्टेशनांवर राष्ट्रीय ताडोबा उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेतली चित्र रेखाटली आहेत.
4 / 8
रेल्वेकडून पारितोषिक जाहीर झाल्यानंतर ही छायाचित्रे सध्या नेटकऱ्यांना भुरळ घालत आहेत.
5 / 8
या छायाचित्रांच्या माध्यमातून ताडोबा उद्यानातील समृद्ध वन्यजीवनाची झलक पाहायला मिळते.
6 / 8
या स्पर्धैेत तिसरा पुरस्कार संयुक्तरीत्या गुजरातमधील गांधीधाम, राजस्थानमधल्या कोटा आणि तेलंगणातल्या सिकंदराबाद स्टेशनांना मिळाला आहे. पहिल्या स्थान पटकावलेल्या विजेत्या स्टेशनला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
7 / 8
दुसऱ्या स्थानी असलेल्या स्थानकांना 5 लाख रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या विजेत्या स्टेशनांना पुरस्काराच्या स्वरूपात 3 लाखांचं बक्षीस मिळणार आहे.
8 / 8
चंद्रपूर रेल्वे स्थानकावरचे जिने, भिंती सर्वच ठिकाणी वन्यजीवांच्या छबी चितारण्यात आल्या आहेत.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSocial Viralसोशल व्हायरल