लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळा

By admin | Published: August 5, 2016 12:00 AM2016-08-05T00:00:00+5:302016-08-05T00:00:00+5:30

सुत्रसंचालकाच्या भुमिकेतून ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मुलाखत घेतली...यावेळी नारायण राणेंनी दिलेल्या दिलखुलास उत्तरांमुळे सभागृहात अनेकवेळा हास्यस्फोट झाला. व्यासपीठावर माजी मंत्री जयंत पाटील आमदार दिलीप सोपल आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. यावेळी व्यासपिठावर रंगलेली राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली.

विधिमंडळातील महिला आमदारांच्या कामगिरीवर आयोजित परिसंवादात विद्या चव्हाण मंदाताई म्हात्रे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे निलम गो-हे आणि यशोमती ठाकूर चर्चा करताना.

तरुण पिढीचा सभागृहांविषयीचा आदर कमी होऊ नये या प्रामाणिक हेतूने या पुरस्कारांचे आयोजन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यादरम्यान लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली..यावेळी त्यांनी काश्मीरसह अनेक मुद्यांवर आपली मतं मांडली.

स्वातंत्र्य दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन हे त्रिकुट गुप्तगू करतानाचा क्षण.

विधिमंडळे हाणामारीसाठी की कायदे करण्यासाठी ? विषयावर आयोजित परिसंवादात ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी आमदार उल्हास पवार विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील सहभागी झाले होते.

लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा आणि एडिचर इन चीफ राजेंद्र दर्डा यांना स्मृतीपत्र देताना आर आर पाटील फांऊडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील सुप्रिया पाटील.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ सोहळ्याच्या निमित्ताने अनेक दिग्गज राजकारणी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा आमदार यशोमती ठाकूर यांचं स्वागत करताना.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचं स्वागत करताना लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा.