जाणून घेऊया साडेतीन शक्तिपीठांचा महिमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 12:27 IST2017-09-21T12:14:09+5:302017-09-21T12:27:40+5:30

जाणून घेऊया साडेतीन शक्तिपीठांचा महिमा
मानवी जीवनात अनेक उपासना केल्या जातात. यामध्ये शक्तिदेवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या अभ्युदयासाठी या शक्तिपीठांचा आपण लाभ घेतो. महाराष्ट्रातल्या या साडेतीन शक्तिपीठांची माहिती.
जाणून घेऊया साडेतीन शक्तिपीठांचा महिमा
तुळजा भवानी देवीने आशिर्वाद म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूविरोधी मोहिमांमध्ये यशस्वी होण्यासाठी भवानी तलवार प्रदान केल्याची आख्यायिका आहे.
जाणून घेऊया साडेतीन शक्तिपीठांचा महिमा
दुष्टप्रवृत्तीचा परिहार झाल्यावर देवी नाशिकजवळच्या वणीच्या डोंगरावर स्थिरावली. या डोंगराला सात शिखरे आहेत. त्यामुळे याला सप्तशृंग म्हणतात. या गडावरची देवी म्हणून सप्तशृंगी देवी.
जाणून घेऊया साडेतीन शक्तिपीठांचा महिमा
माहूरगडावर रेणुकादेवीबरोबरच दत्तात्रय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे आहेत. नांदेड शहरापासून 130 किलोमीटर अंतरावर असलेला हा माहूरगड चोहोबाजुंनी डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.
जाणून घेऊया साडेतीन शक्तिपीठांचा महिमा
श्री महालक्ष्मीचे वेगळेपण म्हणजे नवरात्रीमध्ये भक्तांना 9 दिवस देवीची तेजोमय 9 रुपे पहायला मिळतात आणि देवीचा हा साज पाहण्यासाठी भक्तांची कोल्हापूरला गर्दी सुरू असते.