शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सांगली, कोल्हापुरात महापूर; शहरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत- पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 10:12 AM

1 / 6
मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे.
2 / 6
सांगली जिल्ह्यातील 21 पूल पाण्याखाली आल्याने अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
3 / 6
२४ जुलै १९८९ रोजी पंचगंगा नदीचे पाणी पंचगंगा रुग्णालयाच्या मारूती मंदिराजवळ आले होते . इथपर्यंत पुराचे पाणी कधीच आले नव्हते. त्यामुळे महापालिकेने तेथे त्या घटनेची खूण म्हणून एक शिळा लावली. सोमवारी मध्यरात्री त्या ठिकाणी पुराचे पाणी पोहोचले.
4 / 6
पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
5 / 6
सांगलीतील पुरामुळे एसटी स्टँडमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. 604 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
6 / 6
पंचगंगा नदीला पूर आल्याने पुणे-बंगळुरु हायवेवर पाणी आलं आहे. शिरोळनजीक पुलावर पाणी साचल्याने बंगळुरुकडे जाणारी वाहतूक किणी टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली आहे
टॅग्स :Rainपाऊसfloodपूर