coronavirus: महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंताजनक पातळीवर, या राज्यांमध्येही कोरोना बेलगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:21 PM2021-03-17T21:21:16+5:302021-03-17T21:25:35+5:30

coronavirus in Maharashtra : गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. आज राज्यातील नव्या रुग्णसंख्येत तब्बल २३ हजार १७९ नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. आज राज्यातील नव्या रुग्णसंख्येत तब्बल २३ हजार १७९ नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता अधिकच वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ हजार १७९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ९ हजार १३८ जणांनी कोरोनावर मात केली.

महाराष्ट्रातील आतापर्यंतची कोरोना रुग्णसंख्या २३ लाख ७० हजार ५०७ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१ लाख ६३ हजार ३९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे १ लाख ५२ हजार ७६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृतांची संख्या ही ५३ हजार ०८० एवढी आहे.

दरम्यान, महाराष्ट्राबरोबरच पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पंजाबमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे दोन हजार ३९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गुजरातमध्येही कोरोना रुग्णवाढीने वेग घेतला असून, आज तिथे ११२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर कर्नाटकमध्ये दिवसभरात कोरोनाचे १२७५ नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ४७९ आहे आणि ४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राजधानी दिल्लीमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत असून, ५३६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. या काळात दिल्लीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.