व्यसन नसतानाही होतो कॅन्सर; गंभीर आजार टाळण्यासाठी घ्या 'ही' काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:02 IST2025-02-10T14:58:11+5:302025-02-10T15:02:15+5:30
कॅन्सरमुळे पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब- पूर्वी पन्नाशीनंतर होणारा आतड्याचा कॅन्सर आता पस्तिशीच्या तरुणांनाही होताना दिसत आहे.

केमिकलयुक्त आहार, अतिमद्यसेवन, बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. तरुणांमध्ये तोंडाचा, तसेच आतड्याचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यातच, कोणतेही व्यसन नसतानाही आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो.
नागरिकांनी नियमित भेसळ नसलेला सकस आहार घेणे गरजेचे आहे. मात्र, आता प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ असतेच त्यामुळे अनेकांना कोणतेही व्यसन नसतानाही कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कॅन्सरचे प्रकार- लिव्हर कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, लंग्स कॅन्सर, ब्लड कॅन्सर, मुख कॅन्सर, स्कीन कॅन्सर असे विविध प्रकार आहेत.
कॅन्सरमुळे पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब- पूर्वी पन्नाशीनंतर होणारा आतड्याचा कॅन्सर आता पस्तिशीच्या तरुणांनाही होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या इतर कर्करोगांच्या तुलनेत आतड्याच्या कर्करोगाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
अतिमद्यप्राशनाचा परिणाम- अल्कोहोलमुळे आतड्याच्या कर्करोगासह अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. अल्कोहोल आतड्याच्या आतील बाजूस असलेल्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतो. ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
आतड्याचा कॅन्सर झाला कसे ओळखणार? शौचातून रक्त पडणे, काळ्या रंगाची शौच होणे, पोट नेहमीच फुलल्यासारखे राहणे, हळूहळू वजन कमी होणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा.
कॅन्सर होण्याची कारणे- केमिकलयुक्त आहार, अतिमद्यसेवन, बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फक्त व्यसन असलेल्या रुग्णांनाच कॅन्सर होईल असे नाहीतर काही रुग्णांना साधी सुपारी खाण्याची सवय नसतानाही कॅन्सर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्याच्या खानपाणामुळेही रोगाचे प्रमाण वाढले आहे.