By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:25 IST
1 / 5अशोक खरातने १५० पेक्षा जास्त महिलांवर वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून, तपासातून तो चार सीम कार्ड वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.2 / 5अशोक खरात याने एसआयटी चौकशीत चार मोबाईल क्रमांक वापर असल्याचे आणि सर्व मोबाईल क्रमांक वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरले जात होते. अशोक खरात वापरत असलेल्या चार मोबाईल क्रमांकापैकी एक व्हीव्हीआयपी लोकांशी संपर्क करण्यासाठीच होता.3 / 5अशोक खरात एक मोबाईल क्रमांक फक्त महिला अनुयायांशी संपर्क करण्यासाठीच वापरत होता. तिसरा मोबाईल क्रमांक हा पैशांची देवाण-घेवाण, इतर आर्थिक व्यवहारांसाठी वापरत होता. खरातने जो चौथा मोबाईल क्रमांक वापरायचा तो सामान्य लोकांसाठी होता.4 / 5व्हीव्हीआयपींमध्ये मोठे राजकारणी, मोठे उद्योगपती, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी यांचा समावेश होता. या सगळ्यांचे मोबाईल क्रमांक खरातने कोडवर्ड वापरून सेव्ह केलेले आहेत. प्रशासनातील अनेक अधिकारी अशोक खरातकडे जायचे असेही आता समोर आले आहे.5 / 5 अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे हे मूळ प्रकरण आहे. त्यामुळे शरीरसंबंध ठेवल्यानंतर या महिला गर्भवती होणार नाही, यासाठी खरात काय करायचा? याचा तपास सध्या सुरू आहे. खरात यांच्यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात राहायचा का आणि यात कोणते डॉक्टर आहेत का? याचाही तपास एसआयटी करत आहे.