शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 4:03 PM

1 / 6
बेमुदत संप पुकारलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. (छाया- दत्ता खेडेकर)
2 / 6
आझाद मैदानात धडकलेल्या या मोर्च्यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. (छाया- दत्ता खेडेकर)
3 / 6
शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली होती. (छाया- दत्ता खेडेकेर)
4 / 6
या समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर राज्यांत मिळणारे मानधन व इतर सुविधा यांचा अभ्यास केला होता. (छाया- दत्ता खेडेकर)
5 / 6
राज्यातील ९७ हजार सेविका आणि ९६ हजार मदतनीस, तसेच १२ हजार मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधनवाढीचा अहवाल शासनाला दिला. (छाया- दत्ता खेडेकर)
6 / 6
शासन मानधनवाढ करीत नसल्याने कृती समितीने ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याची घोषणा केली. (छाया- दत्ता खेडेकर)