शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Death :'सह्याद्री'चाही कंठ आला दाटून! लाडक्या पुतण्याला अखेरचा निरोप देताना शरद पवारांचे मन हेलावून टाकणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:07 IST

1 / 8
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) विमान अपघातामध्ये बारामतीमध्ये निधन झाले. महाराष्ट्रासह पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.
2 / 8
अजित पवार हे शरद पवार यांच्या जवळचे आणि लाडके पुतणे होते. आपल्या लाडक्या पुतण्याच्या एक्झिटने शरद पवार यांच्यावर मोठा आघात झाला. अजित पवार यांच्या अंत्यदर्शनावेळी शरद पवार यांच्या भावमुद्रेने सर्वांनाच भावुक केले.
3 / 8
खासदार शरद पवार यांनी आपला लाडका पुतण्या अजित पवार यांची राजकीय कारकीर्द फुलवली. शरद पवार यांनी अजित पवार यांना राज्याच्या राजकारणाच्या मुख्य पटलावर आणले.
4 / 8
अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते. पण, अजित पवार यांच्या अकाली निधनाने एक बाजू पूर्ण संपल्याची चर्चा सुरू आहेत.
5 / 8
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी खासदार शरद पवार शांतपणे बसले होते, डोळ्यातील अश्रू आवरत ते सर्वांना फक्त नमस्कार करत होते.
6 / 8
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी खासदार शरद पवार शांतपणे बसले होते, डोळ्यातील अश्रू आवरत ते सर्वांना फक्त नमस्कार करत होते.
7 / 8
खासदार शरद पवार यांनाही हुंदका आवरत नव्हता. समोर मोठा जनसमुदाय होता, अजित पवार यांना आंदरांजली देण्यासाठी राज्यासह देशातून नेत्यांनी गर्दी केली होती.
8 / 8
खासदार शरद पवार यांना पाहून सर्व निशब्द झाले होते. पवार यांचे यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती