तुम्ही सिंगल आहात?, मग 2019मध्ये करा या 7 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 18:50 IST2019-01-02T18:43:19+5:302019-01-02T18:50:33+5:30

1. स्वतःवर प्रेम करा - नवीन वर्षांची जल्लोषात सुरुवात झाली आहे. तर न्यू ईअरची सकारात्मक सुरुवात करत स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचीच कंपनी एन्जॉय करा आणि आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणार, असे स्वतःलाच वचन द्या.

2. स्वतःवरच शंका घेऊ नका - तुमचे एखादं रिलेशनशिप संपुष्टात आल्यानंतर 'मी रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या लायक नाही','कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही' किंवा 'आता मला पुन्हा कोणावर प्रेम करता येईल का?', यांसारखे नकारत्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वास-सकारात्मक विचारांनी नवीन वर्षाचं हसतमुखानं स्वागत करा.

3. स्वतःची कामं स्वतः करा - माझी सर्व कामं मी स्वतःच करणार, अशी शपथ घ्या. एकटे फिरणं असो, आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेणं असो किंवा कोणालाही डेट न करताही कोणत्याही पार्टीमध्ये जाणं असो, सर्वत्र शक्यतो एकट्यानं फिरण्याचा निश्चय करा. सर्व गोष्टी एकट्यानं करण्याचा प्रयत्न करा आणि अधिक स्वातंत्र्य मिळवा. ही गोष्ट आत्मसात करण्यास वेळ लागेल पण नवनवीन गोष्टी शिकताना आत्मविश्वास वाढण्यासही मदत होईल.

4. चांगल्या गोष्टींची सवय लावण्याचा निश्चय - आरोग्यास फायदेशीर ठरतील, अशा सवयी लावून घेण्याचा निश्चय करा. यामध्ये 30 मिनिटांसाठी व्यायाम, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, सकाळी लवकर उठणे, वेळेवर झोपणे, खाणे-पिणे आणि योग यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा.

5. स्वतःची कोणासोबतही तुलना करू नका - करिअर, लव्ह लाइफ, फॅशन सेन्स, शरीर रचना इत्यादी यामध्ये कळतनकळत तुम्ही स्वतःचीच तुलना इतरांसोबत करू लागता. यामुळे तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास कमी करुन घेता. त्यामुळे स्वतःची इतरांसोबत तुलना करणं टाळा.

6. जुन्या मित्रांसोबत पुन्हा कनेक्ट व्हा - बऱ्याचदा तुम्ही करिअर, स्पर्धा यामध्ये इतके व्यस्त होऊन जाता की, तुम्हाला मित्रांना वेळ देणं शक्य होत नाही. त्यामुळे नवीन वर्षात मित्रांसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा.

7. जास्त विचार करू नका - जर तुम्हाला जास्त विचार करण्याची सवय असेल तर नवीन वर्षामध्ये या वाईट सवयींपासून सुटका करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. जास्त विचार केल्यानं समस्या सुटत नाहीत तर अधिक वाढतात.