ND vs ENG 4th Test Day 5 Live Updates: भारतीय संघाने पहिले दोन गडी शून्यावर गमावले. त्यानंतर अनुभवी केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांनी दीडशतकी भागीदारी करत भारतीयांना आशेचा किरण दाखवला. आजच्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी काही महत्त्वाचे घटक सामन्य ...
Joe Root Is Now In The Top Three Run Scorers In History Of Test Cricket : एक नजर कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या रेकॉर्डवर ...
Hair fall and split ends treatment : Damaged hair repair tips : Homemade oil for hair repair : आपल्याही केसांना फाटे फुटत असतील तर हे घरगुती उपाय करुन पाहा. ...
Health Tips: मांड्या कपड्यांमुळे झाकलेल्या असल्या तरी नेहमी होणाऱ्या घर्षणामुळे त्या भागाची त्वचा कोरडी पडते, रखरखीत होते आणि काळवंडते. त्यावर तात्पुरते उपाय न शोधता ही समस्या कायमची सोडवता आली तर? याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ. ...
Health Tips: गुप्तांग...शरीराचा सगळ्यात नाजूक भाग. तो स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी निसर्गाने केलेली रचना म्हणजे त्याच्या सभोवती असणारे केस, ज्याला आपण प्युबिक हेअर म्हणतो. ते काढावेत की नाही हा प्रश्न अनेकांना संभ्रमात टाकतो. त्याचे य ...
थांबा ! वापरलेल्या टी बॅग्स फेकून देता?, असा करा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 18:32 IST2018-10-22T18:29:12+5:302018-10-22T18:32:02+5:30
1. फ्रिजमधील दुर्गंधी घालवा : फ्रिजची नियमित स्वच्छता होत नसल्यानं काही दिवसांनी फ्रिजमध्ये वास येऊ लागते. उग्र वास दूर करण्यासाठी टी-बॅगची चांगली मदत होते. वापर केलेली टी-बॅग फेकण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेऊन द्या. यामुळे दुर्गंधी येणार नाही.
2. नैसर्गिक माऊथफ्रेशनर : ग्रीन टी किंवा पेपरमिंटसारख्या बॅग्सपासून तुम्ही नैसर्गिक माऊथफ्रेशनरही बनवू शकता. यासाठी टी बॅग्स गरम पाण्यात भिजवून थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तुमचे नैसर्गिक माऊथफ्रेशनर झाले तयार.
3. काचांची सफाई : काचांवर कोणत्याही प्रकारचे डाग पडले असल्यास, टी बॅगनं काच स्वच्छ करा. टी बॅगच्या मदतीनं खिडकी, ड्रेसिंग टेबलच्या काचा हलक्या हातांनी स्वच्छ करा.
4. घरातून उदरांना पळवा : उंदीर घरामध्ये दुर्गंधी पसरवण्यासहीत साहित्यांची नासाडी करतात. नासधूस करणाऱ्या या उंदरांचा कायमचा बंदोबस्त लावण्यासाठी टी बॅगची मदत घ्या. टी बॅगवर पेपरमिंट ऑईलचे काही थेंब शिंपडा आणि ज्या ठिकाणी उंदीर, कोळी, मुंग्याचा वावर जास्त आहे, तेथे हे टी बॅग ठेऊन द्या.
5. लाकडी फर्निचर आणि जमिनीची सफाई : लाकडी फर्निचर आणि जमिनीला चमकवायची आहे?, मग टी बॅग पाण्यात गरम करावी आणि नंतर थंड होऊ द्यावी. टी बॅग असलेल्या पाण्यानं मऊ कापडाच्या मदतीनं फर्निचर आणि जमिनीची सफाई करावी.