काळाचा घाला ! भीषण दुर्घटनेत 5 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 12:08 IST2018-02-19T09:08:03+5:302018-02-19T12:08:35+5:30

कोल्हापुरात सोमवारी (19 फेब्रुवारी ) पहाटे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी सांगलीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवजयंतीनिमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. सुमारे 30 विद्यार्थी ट्रकमधून सांगलीला जात असताना हा अपघात झाला.

समोरुन आलेल्या बाईकला चुकवताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी ट्रकखाली चिरडले गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमींची घेतली भेट