नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीला विद्युत रोषणाईचा साज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 23:33 IST2018-10-12T23:24:33+5:302018-10-12T23:33:42+5:30

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रीनिमित मंदिराला विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं आहे.
देवीची रोज बांधली जाणारी पूजा हे या नवरात्रौत्सवाचे खास वैशिष्ट्य असते.
पहिल्या दोन दिवसातच तीन लाखांहून अधिक भाविकांची नोंद झाली होती.
शुक्रवार हा देवीउपासनेचा वार असल्याने यादिवशी पहिल्या दोन दिवसांपेक्षा जास्त गर्दी होती.
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे.