जगातले असे फेमस जादूगार ज्यांचा स्टंट करतानाच झाला अंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 03:30 PM2023-11-28T15:30:45+5:302023-11-28T15:40:11+5:30

आज आम्ही तुम्हाला अशाच काही जादुगारांबाबत सांगणार आहोत ज्यांना स्टंट दरम्यान त्यांचा जीव गमवावा लागला.

जादुगारांचे वेगवेगळे स्टंट बघणं कुणालाही आवडतं. कधी त्यांचे स्टंट इतके खतरनाक असतात की, बघणाऱ्यांना घाम फुटतो. तर कधी कधी हे स्टंट जादुगारांना त्यांचेच स्टंट महागात पडतात. त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही जादुगारांबाबत सांगणार आहोत ज्यांना स्टंट दरम्यान त्यांचा जीव गमवावा लागला.

1) JOE BURRUS AND THE CEMENT - Joe Burrus ला Amazing Joe नावानेही ओळखलं जात होतं. Coffin आत बंद स्वत:ला बंद करून घेत तो एक अॅक्ट करत होता. या Coffin वर सीमेंट टाकलं गेलं होतं. Joe ने दावा केला होता की, तो सुरक्षित Coffin मधून बाहेर येणार. पण असं झालं नाही.

2) PRINCESS TENKO AND THE 10 SWORDS - Princess Tenko आपल्या Costumes Performance साठी ओळखली जात होती. एका अॅक्ट दरम्यान तिने तिच्या कपड्यांवर १० तलवारी बांधल्या जात होत्या. यात जराही चूक झाली तर तिचा जीव जाणार अशी स्थिती राहत होती. अशाच एका अ‍ॅक्टमध्ये तिचा मृत्यू झाला.

3) CHARLES ROWAN AND THE SPEEDING CAR - एका कार स्टंटदरम्यान Charles Rowan चा मृत्यू झाला होता. या स्टंटमध्ये त्याला कारपेक्षा अधिक वेगाने धावायचे होते.

4) GENESTA AND THE MILK CAN - Royden Joseph Gilbert Raison de la Genesta ला पाण्याने भरलेल्या टॅंकमध्ये करायचा होता. ज्यात तो यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

5) BALABREGA AND THE FLAMING MOTHS - Balabrega हा जादूगार आगीत एक स्टंट करण्यात असफल राहिला होता. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.