By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:58 IST
1 / 8Airplane Interesting Facts : काही सिनेमांमध्ये आपण पाहत असतो की, जेव्हा सैन्याच्या एखाद्या फायटर जेटला आग लागते किंवा एखादी दुर्घटना घडते तेव्हा पायलट एका झटक्यात पॅराशूटने बाहेर निघतो. अशात कुणाच्याही मनात असा प्रश्न येऊ शकतो की, पॅसेंजर प्लेनमध्ये म्हणजेच प्रवासी विमानांमध्ये पॅराशूटची सुविधा का दिली जात नाही? शेकडो प्रवासी असलेल्या विमानात जर सीटखाली पॅराशूट दिले तर इमरजन्सीमध्ये लोक आपला जीव वाचवू शकतात, असाही विचार येऊ शकतो. त्यामुळे विमानात पॅराशूट का नसतात याचं उत्तर आपण जाणून घेऊया.2 / 8मुळात फायटर जेट आणि पॅसेंजर प्लेनचं काम, त्यांचं डिझाइन आणि त्यांचा उद्देश हा वेगवेगळा असतो. सामान्यपणे फायटर जेट हे एक किंवा दोन पायलटसाठी बनवले जातात. त्यांचं काम फारच वेगळ्या स्थितीत उड्डाण घेणं असतं. तेच प्रवासी विमानं ही एकाचवेळी शेकडो प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बनवलेले असतात. 3 / 8विमानात पॅराशूट का नसतात? या प्रश्नाचं उत्तर याच फरकात दडलेलं आहे. फायटर जेटमध्ये पायलटजवळ इजेक्शन सीट असते. काही अनुचित घडलं तर पायलट सीटसहीत बाहेर पडतो आणि पॅराशूट उघडलं जातं. अर्थात यासाठी पायलटचा खास ट्रेनिंग दिलं जातं. किती उंचावरून, किती स्पीडमध्ये आणि कोणत्या दिशेने बाहेर पडायचं हे त्यांना शिकवलं जातं. 4 / 8फायटर जेटच्या पायलट्सना निर्णय काही सेकंदात निर्णय घ्यावा लागतो. तरच त्यांचा जीव वाचू शकतो. दुसरीकडे प्रवासी विमानं ही साधारणपणे ४० हजार फूटाच्या उंचीवर उडत असतात. इतक्या उंचीवर हवेत ऑक्सीजन फारच कमी असतं आणि तापमान शून्यापेक्षा खाली गेलेलं असतं. 5 / 8जर एखादा प्रवासी अचानक पॅराशूट घेऊन बाहेर उडी मारेल, तर त्याला श्वास घेण्यास अडचण येईल आणि थंडीमुळे त्याला झटकाही बसेल. खास सूट आणि ट्रेनिंगशिवाय इतक्या उंचीवर जिवंत राहणं फारच अवघड आहे. 6 / 8प्रवासी विमानांचा स्पीड ८०० ते ९०० किलोमीटर प्रति तास इतका असतो. इतक्या स्पीडमध्ये विमानातून बाहेर पडणं जीवघेणं ठरू शकतं. हवेचा दाब शरीराचं मोठं नुकसान करू शकतो. इतकंच नाही तर विमानाचं डिझाइन असं असतं की, दरवाजे किंवा खिडक्या हवेत उघडणं सोपं नसतं. 7 / 8चुकीच्या वेळी उघडल्या गेलेल्या दरवाजामुळे पूर्ण विमानाचा बॅलन्स बिघडू शकतो. एका प्रवासी विमानात १५० ते ४०० प्रवासी असतात. जर सगळ्यांसाठी पॅराशूट ठेवले गेले, तर विमानाचं वजन वाढेल. इंधनाचा खर्च वाढेल आणि उड्डाण घेणंही महाग होईल. आणखी एक मुद्दा म्हणजे प्रत्येक प्रवाशाला पॅराशूट कसं वापरायचं याचं ट्रेनिंग देणंही शक्य नाही. 8 / 8दुर्घटनेच्या स्थितीत हा उपाय जीव वाचवण्याऐवजी आणखी घातक ठरू शकतो. प्रवासी विमानांमध्ये सुरक्षेसाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. शिवाय वेगवेगळे सिक्टुरिटी सिस्टीम, ऑटोमॅटिक कंट्रोल लावलेले असतात. इमरजन्सी लँडिंग आणि स्लाइड्ससारखे उपाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठरवलेले असतात.