मुंग्या नेहमीच एका रेषेत का चालतात? जाणून घ्या रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:56 PM2019-08-06T14:56:24+5:302019-08-06T15:05:32+5:30

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी छोटे-छोटे जीव-जंतू हे महत्वाची भूमिका बजावतात. यातीलच एक आहे मुंगी. तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की, मुंग्या सरळ एका रेषेत चालतात. पण कधी त्यांच्या एका रेषेत चालण्यावरून तुम्हाला प्रश्न पडला का? कदाचित अनेकांना पडला असेल. आज आपण मुंग्यांचं असं एका रेषेत चालण्याचं रहस्य जाणून घेणार आहोत. (Image Credit : successinks.com)

मुंग्या या सामाजिक जीव आहेत. ज्या कॉलनीमध्ये राहतात. या कॉलनीमध्ये मुंग्यांची राणी, मादा मुंगी आणि खूपसाऱ्या मादा मुंग्या असतात. राणीच्या पिलांची संख्या खूप असते. मादा मुंग्यांची ओळख ही असते की, त्यांना पंख असतात. तर मादा मुंग्यांना पंख नसतात. (Image Credit : Social Media)

सामान्यपणे आपल्याला केवळ लाल आणि काळ्या मुंग्यांबाबतच माहिती असतं. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जगभरात मुंग्यांच्या १२ हजारांपेक्षा अधिक प्रजाति आहेत. अंटार्कटिका सोडून जगभरात सगळीकडे मुंग्या आढळतात. (Image Credit : Social Media)

जगातील सर्वात धोकादायक मुंग्या ब्राझीलच्या अमेझॉनच्या जंगलात आढळतात. असे म्हणतात की, त्यांच्या चाव्याने बंदुकीची गोळी लागल्यासारखी वेदना होते. त्यामुळेच या मुंग्यांना बुलेट एंट असं नाव देण्यात आलं आहे. (Image Credit : Flickr)

मुंग्या ह्या सर्वात जास्त जगणाऱ्या किड्यांच्या श्रेणीत येतात. जगात असे काही किटक आहेत, जे काही तास किंवा काही दिवसच जिवंत राहतात. तर एक विशेष प्रजाति असलेले 'पोगोनॉमीमेक्स ऑही' किटकांची राणी ३० वर्ष जगते. (Image Credit : Social Media)

मुंग्या त्यांच्या आकारानुसार जगातल्या सर्वात मजबूत जिवांपैकी एक आहे. त्या दिसायला भलेही छोट्या असतील, पण त्यांच्यात त्यांच्या वजनापेक्षा ५० पटीने अधिक वजन उचलण्याची क्षमता असते. (Image Credit : Social Media)

मुंग्यांच्या शरीरात फुप्फुस नसतात. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड घेण्या-सोडण्यासाठी त्यांच्या शरीरावर छोटी छोटी छिद्रे असतात. तसेच मुंग्यांना कानही नसतात. त्या जमिनीच्या कंपनावरून अंदाज घेतात. (Image Credit : Social Media)

मुंग्यांना डोळे असतात, पण ते केवळ दिखाव्यासाठी असतात. डोळे असूनही त्यांना दिसत नाही. जेवणाच्या शोधात जेव्हा मुंग्या बाहेर निघतात तेव्हा त्यांची राणी मार्गात एक फेरोमोन्स नावाचं रसायन सोडत जाते. या रसायनाचा गंध घेत इतर मुंग्या एकामागे एक जातात. याच कारणामुळे त्यामुळेच मुंग्या एका रेषेत चालतात. (Image Credit : Social Media)