By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 14:24 IST
1 / 7Airplane Curved Path : आपण जेव्हा आकाशात एखादं विमान उडताना बघतो तेव्हा ते सरळ रेषेत पुढे जात असल्याचं दिसतं. पण जर आपण कधी मॅपवर एखादं विमान ट्रॅक केलं तर दिसेल की, विमान क्वचितच सरळ रेषेत उडतं. सामान्यपणे जास्तीत जास्त विमानं हे वळण घेऊन म्हणजे वक्र दिशेने उडतात. पण विमान असे वळण घेऊन का उडतात, सरळ का उडत नाहीत? याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.2 / 7मुळात पृथ्वी गोल असल्याने दोन पॉइंट्समध्ये सगळ्यात छोटं अंतर फ्लॅट मॅपवर सरळ लाइन नसून एक वळणदार रस्ता आहे. याला ग्रेट सर्कल रूट म्हटलं जातं. हा रस्ता पृथ्वीच्या नॅचरल वक्राला फॉलो करतो आणि विमानाला कमीत कमी वेळेत आपल्या ठिकाणावर पोहोचवतो.3 / 7ग्रेट सर्कल रूटवर उड्डाण घेतल्याने विमानं फ्लॅट मॅपच्या सरळ मार्गाच्या तुलनेत एकूण कमी किलोमीटर उडतात. याने इंधनाची मोठी बचत होते आणि एअरलाईन्सचा खर्च वाचवण्यास मदत मिळते.4 / 7लांब इंटरनॅशनल फ्लाइट्स एअरक्राप्ट अनेकदा मोठ्या समुद्रावर सरळ उड्डाण घेण्याऐवजी अलास्का, ग्रीनलँड किंवा रशियासारख्या देशांकडे वळतात. यातून हे निश्चित होतं की, इमरजन्सीमध्ये पायलट दूरच्या समुद्री भागात अडकून राहण्याऐवजी जवळच्या एअरपोर्टपर्यंत लवकर पोहोचू शकतील. 5 / 7आपण जो नकाशा बघतो त्यात गोल पृथ्वी फ्लॅट दिसते. जेव्हा एक गोल गोष्ट फ्लॅट स्क्रीनवरवर दिसत असेल तर अंतर आणि रस्ते विस्कळीत दिसतात. ग्लोबवर सरळ रस्ता अनेकदा 2D मॅपवर वळणदार दिसतो. 6 / 7पायलट जेट स्ट्रीमसारख्या चांगल्या हवेच्या प्रवाहाचा फायदा उचलण्यासाठी रस्ते बदलतात. याने विमान वेगाने पुढे सरकतं आणि फ्यूलचा वापरही कमी होतो. तसेच ते वादळ, टर्बुलेंस आणि भयावह वातावरणातून बचाव करू शकतात. यासाठी रस्त्यात थोडा बदलण्याची गरज पडू शकते.7 / 7अॅडव्हांस फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टीम सगळ्यात चांगला रस्ता शोधण्यासाठी सॅटलाईट नॅव्हिगेशन आणि रिअल टाइम डेटाचा वापर करते. ही सिस्टीम सुरक्षित आणि सगळ्यात चांगला रस्ता निश्चित करण्यासाठी पृथ्वीचं वळण, वातावरण, एअर ट्रॅफिक आणि फ्यूल एफिशिएन्सी समजू शकते.