ख्रिश्चन लग्नात नवरीच्या मैत्रिणी एकसारखेच कपडे का घालतात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:27 PM2023-12-01T15:27:56+5:302023-12-01T15:45:41+5:30

कधीना कधी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की, नवरीच्या मैत्रिणी असे एकसारखे कपडे का घालत असतील?

अनेक सिनेमांमध्ये किंवा प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं असेल की, ख्रिश्चन समाजातील लग्नांमध्ये नवरीच्या काही मैत्रिणी एकसारखेच कपडे घालून असतात. आता हा ट्रेन्ड तर इतर धर्मातील मुलींही फॉलो करू लागल्या आहेत. पण कधीना कधी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की, नवरीच्या मैत्रिणी असे एकसारखे कपडे का घालत असतील?

आपण जुन्या काळातून नव्या काळात आलो तर आहोत, पण आजही अनेक जुने रितीरिवाज फॉलो केले जातात पूर्वीच्या काळात लग्नाच्या स्टेजवरूनच नवरीचं अपहरण केलं जातं होतं. त्यामुळे ख्रिश्चन लग्नांमध्ये नवरी नवरदेवाच्या उजव्या बाजूने उभे असते. जेणेकरून नवरदेव उजव्या हाताने तलवारबाजी करून नवरीला वाचवू शकेल.

कधीकाळी असा होता जेव्हा ब्राइडमेड्स म्हणजे नवरीच्या मैत्रिणी एकसारखे कपडेच नाही तर नवरीसारख्या तयारही व्हायच्या.

लेखिका Hanne Blank यांच्यानुसार, असं करण्याचं मुख्य कारण हे होतं की, वाईट शक्तींना कन्फ्यूज करणे. त्यावेळी अशी मान्यता होती की, नवरीला कुणी काळी जादू करून नुकसान पोहोचवू शकतं.

नवरीसारखंच सजण्याची ही प्रथा असल्याचे पुरावे रोम आणि चीनमध्ये मिळतात. अनेकदा नवरी फार जास्त अंतर पार करून नवरदेवाच्या घरी पोहोचते.

रस्त्यात डाकूंकडून नवरीचं अपहरण होण्याची भीती राहत होती. एकसारखे कपडे घातल्याने नवरीला ओळखणं अवघड व्हायचं. नंतर हळूहळू हा एकासारखे कपडे घालण्याचा अलिखित नियमच तयार झाला.

काही रोमन वेडींग कस्टम्सनुसार, लग्नात साक्षीदार म्हणून १० लोकांना एकसारखे कपडे घालत होते. यावेळी नवरीला आपला चेहरा झाकून ठेवावा लागतो, जेणेकरून ती वाईट नजरांपासून वाचू शकेल.

काळ बदलला पण नियम काही बदलला नाही. १८४० मध्ये जेव्हा राणी व्हिक्टोरियाने राजकुमार अल्बर्टसोबत लग्न केलं तेव्हा १२ ब्राइड्समेड्सनी राणीच्या कपड्यांशी मिळते-जुळते कपडे घातले होते.

हे सत्य मानलं तर असं म्हणनं चूक ठरणार नाही की, अनेक ब्राइड्समेड्सने नवरीसाठी जीवाची बाजी लावली आहे.