व्हाइट कॉलर जॉब अनेकदा ऐकलं असेलच, पण ब्लू, पिंक, गोल्ड, ग्रे कॉलर जॉबचा अर्थ काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:21 IST2026-03-16T14:50:03+5:302026-03-16T15:21:12+5:30
एखाद्या खासप्रकारच्या नोकरीसाठी व्हाइट कॉलर असा शब्द वापरतात, तसे पिंक कॉलर, ब्लू कॉलर, व्हाइट कॉलर आणि ग्रे कॉलर जॉब असेही शब्द आहेत. त्यांचा अर्थ काय असतो?

नोकरी वेगवेगळ्या प्रकारची असते. काही लोकांना एकाजागी बसून काम करावं लागतं, तर काही लोकांना बाहेर फिरत काम करावं लागतं. अनेकदा आपण बघतो की, एकाजागी बसून काम करणाऱ्यांचा अनेकांना हेवा वाटतो. तुम्ही काय नशीबवान आहात...असं त्यांना म्हटलं जातं. चांगली आरामदायक नोकरी असेल तर त्यासाठी 'व्हाइट कॉलर' नोकरी आहे असं साहजिक बोललं जातं. हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल. पण अनेकांना हे माहीत नसतं की, जसा एखाद्या खासप्रकारच्या नोकरीसाठी व्हाइट कॉलर असा शब्द वापरतात, तसे पिंक कॉलर, ब्लू कॉलर, व्हाइट कॉलर आणि ग्रे कॉलर जॉब असेही शब्द आहेत. त्यांचा अर्थ काय असतो? मुळात हे शब्द वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांसाठी आणि काम करण्याच्या पद्धती दर्शवण्यासाठी वापरले जातात. चला तर जाणून घेऊ या शब्दांचे अर्थ....

ब्लू कॉलर जॉब
ब्लू कॉलर जॉब कॅटेगरीमध्ये असे लोक येतात, जे मजुरीचं काम करतात. याचा अर्थ हा की, जे लोक शारीरिक श्रमाचं काम करतात जसे की, वेल्डर, मेकॅनिक, मजूर किंवा फॅक्टरी वर्कर.

व्हाइट कॉलर जॉब
व्हाइट कॉलर जॉबमध्ये अशा लोकांचा समावेश असतो, जे लोक ऑफिसमध्ये बसून काम करतात. नोकरीच्या या प्रकारात स्किल्ड प्रोफेशनल काम करतात जसे की, मॅनेजर, इंजिनिअर किंवा बँक कर्मचारी. सोप्या भाषेत व्हाइट कॉलर जॉबचा अर्थ हा आहे की, या कॅटेगरीतील नोकरी करणारे लोक सूट आणि टाय घालून असलेले असतात. त्यांच्या शर्टच्या कॉलरचा रंग व्हाइट असतो.

गोल्ड कॉलर जॉब
या जॉबच्या कॅटेगरीमध्ये अशा लोकांचा समावेश केला जातो, ज्यांच्याकडे फार जास्त स्किल आहे जसे की, डॉक्टर, वैज्ञानिक किंवा वकिल. यात काम करणारे लोक कंपनी चालवण्यात मुख्य भूमिका निभावतात आणि आपल्या क्षेत्रातील एक्सपर्ट असतात.

पिंक कॉलर जॉब
पिंक कॉलर जॉब या कॅटेगरीतील लोक सेवा क्षेत्राशी संबंधित असतात. जसे की, नर्स किंवा शिक्षक. या नोकरींमध्ये जास्तकरून महिलांना हायर केलं जातं. त्यामुळे याला पिंक कॉलर जॉब नावाने ओळखलं जातं.

ग्रे कॉलर जॉब
ग्रे कॉलर जॉब एक असा शब्द आहे, जो अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरला जातो जे व्हाइट आणि ब्लू कॉलरच्या मधे येतात. यात टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट, सुरक्षा गार्ड आणि हेल्थकेअर क्षेत्रातील लोकांचा समावेश असतो.

















