रेल्वेतील स्लीपर, एसी कोच तर पाहिले असतील, पण हा M कोच नेमका असतो? पाहा काय आहे याचं वेगळेपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:13 IST2026-03-12T15:28:27+5:302026-03-12T16:13:29+5:30
M1 Board Meaning On Railway Coaches: आतापर्यंत आपण अनेक रेल्वेत SL, 1A, 2A, 3A, 2S आणि CC कॅटेगरीचे कोच पाहिले असतील. पण आज आम्ही आपल्याला M कोड असणाऱ्या कोचबाबत सांगणार आहोत.

M1 Board Meaning On Railway Coaches: रेल्वेने प्रवास केला नाही असा व्यक्ती भारतात क्वचितच कुणी सापडेल. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. कधी जनरल डब्यातून तर कधी स्लीपर डब्यातून. यावेळी आपण पाहिलं असेल की, रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोच असतात. यांमध्ये मिळणाऱ्या सुविधांनुसार या डब्यांना कोड देण्यात आले आहेत. आतापर्यंत आपण अनेक रेल्वेत SL, 1A, 2A, 3A, 2S आणि CC कॅटेगरीचे कोच पाहिले असतील. पण आज आम्ही आपल्याला M कोड असणाऱ्या कोचबाबत सांगणार आहोत.

आपल्या माहीत असेल की, जर कोचवर म्हणजेच रेल्वेच्या डब्यावर जर S लिहिलं असेल तर तो डबा स्लीपर असतो. तसेच तिकीटावर B1 किंवा B2 लिहिलेलं असेल तर हे तिकीट थर्ड एसीचं असतं.

पण क्वचितच काही लोकांना माहीत असेल की, M कोड थर्ड एसी इकोनॉमी (AC-3) साठी वापरला जातो. या डब्यात थर्ड एसीसारख्याच सुविधा मिळतात.

2021 मध्ये रेल्वेकडून AC-3 म्हणजे 3A कॅटेगरीच्या कोचला अधिक चांगल्या सुविधांसोबत रेल्वेत जोडले होते. या कोचना M कोडच्या नावाने ओळखलं जातं. पण ही सुविधा अजून काही मोजक्याच रेल्वेंमध्ये सुरू करण्यात आली आहे.

थर्ड एसी कोचच्या तुलनेत M कोड कोच आरामदायक आणि कमी भाडे असलेले असतात. हे डबे सध्या काही मोजक्याच रेल्वेत जोडण्यात येतात.

खास बाब ही आहे की, AC-3 टियर इकोनॉमी कोचमध्ये 72 च्या जागी 83 सीट असतात. यात वरच्या सीटवर चढण्यासाठी अधिक चांगली सुविधा असते. हे कोच स्लीपरच्या क्लास वरचे आणि थर्ड एसीपेक्षा एक क्लास खालचे कोच असतात.

तसेच A कोड असलेल्या कोचचा अर्थ हा आहे की, हे कोच सेकंड एसी क्लासचे आहेत. तर D कोडचा अर्थ होतो की, तिकीट सेकंड सीटिंग क्लास कोचची आहे.

















