रिटायर झाल्यावर कुठं जातं विमान आणि काय केलं जातं त्याचं? वाचाल हैराण व्हाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:34 PM2021-11-29T19:34:33+5:302021-11-29T19:45:58+5:30

तुम्हाला जर विचारलं की, उड्डाण घेणाऱ्या विमानाचं वय किती असतं? म्हणजे एका विमान किती वर्षे उड्डाण घेतल्यावर रिटायर होतं. त्यानंतर त्याचं काय केलं जातं? चला जाणून घेऊ याच प्रश्नांची उत्तरं..

विमानात बसण्याची अनेकांची इच्छा असते. सोबतच विमानाबाबत काही इंटरेस्टींग गोष्टी जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता असते. अशात तुम्हाला जर विचारलं की, उड्डाण घेणाऱ्या विमानाचं वय किती असतं? म्हणजे एका विमान किती वर्षे उड्डाण घेतल्यावर रिटायर होतं. त्यानंतर त्याचं काय केलं जातं? चला जाणून घेऊ याच प्रश्नांची उत्तरं..

प्रत्येक वस्तूप्रमाणे विमानाचंही एक वय असतं. त्यानंतर त्यांना रिटायर केलं जातं. सामान्यपणे विमानाचं रिटायरमेंटचं वय २५ वर्षे असतं. जर मेंटनन्स चांगला असेल तर आणखी चालवलं जाऊ शकतं. रिटायर झाल्यावर विमानाचं शेवटचं उड्डाण हे फ्लाइट स्टोरेज डेपोकडे होत असते. ज्याला एअरप्लेन बोनयार्ड किंवा ग्रेवयार्डही म्हटलं जातं.

तुम्हाला माहीत आहे का की, एक विमान रिटायर झाल्यावर त्यांचं काय केलं जातं आणि त्यांची शेवटचं उड्डाण कुठल्या दिशेने असतं. त्याला विमानांची स्मशानभूमी म्हटलं जातं. तसे तर विमानांचं स्टोरेज डेपो जगभरात आहेत. पण एक देश असा आहे जिथे विमानांचे स्टोरेज डेपो जास्त आहेत.

अस स्टोरेज डेपो सर्वात जास्त अमेरिकेतील दक्षिण आणि पश्चिम प्रांतात आहेत. तिथे बरीच मोकळी-रिकामी जागा आहे. तिथे असे स्टोरेज डेपो तयार करणं सोपं आहे. अमेरिकेत अनेक वाळवंटात असे स्टोरेज डेपो तयार केले आहेत. इथे मोठ्या संख्येने रिटायर झालेले विमानन येऊन आराम करतात.

विमान इथे आल्यावर आधी त्यांची सफाई केली जाते. त्यासोबत या विमानांना गंज लागू नये म्हणून काही रसायनाचे फवारे मारले जातात. त्यानंतर ईंधन टाकीतून पूर्ण ईंधन काढलं जातं.

नंतर सुरू होतं की, एक एक पार्ट, मशीन आणि साहित्य काढण्याचं काम. विमानात एकूण ३.५ पार्ट्स असतात. जे काढले जातात. या वस्तूंचा वापर इतर विमानांसाठी केला जातो. या वस्तूंची विमान रिपेअरिंग मार्केटमध्ये मोठी मागणी असते. मग शिल्लक राहते केवळ विमानाची बॉडी.

मग क्रेन आणि मशीनींच्या मदतीने ही बॉडीला डिस्मेंटल करण्याचं काम सुरू होतं. विमानाची पूर्ण बॉडी वेगवेगळी करून क्रश केली जाते. त्यानंतर ते पार्ट्स वितळवले जातात आणि रिसायकल करून पुन्हा वापरले जातात. अनेकदा विमानांची रिकामी बॉडी काही कंपन्या खरेदी करतात.

म्हणजे स्वीडनमध्ये एका कंपनीने अनेक विमानांच्या रिकाम्या बॉडीजना २५ रूमच्या हॉटेलमध्ये रूपांतरित केलं आहे. तुर्कीमध्ये हे रेस्टॉरन्ट उघडलं आहे. भारतात दिल्लीहून हरयाणाला जात असताना विमानांच्या बॉडी दिसतात. पण सर्वात शानदार काम झालं आहे मेक्सिकोमध्ये. तिथे २०० विमानांच्या रिकाम्या बॉडीपासून एक विशाल गिलेस्को लायब्ररी तयार केली आहे.

या लाायब्ररीच्या आत बरंच काही बनवण्यात आलं आहे. बोईंग ७२७ आणि ७३७ च्या बॉडीला मिळून बनवलेल्या या लायब्ररीत पुस्तकांसोबत मीटिंग रूम्स, दोन ऑडोटोरिअम आणि अनेक प्रकारचे कक्ष आहे.