असं ठिकाण जिथे पुरूष बनतात नवरी आणि महिला चोरतात दुसऱ्यांचे पती, अजब रिवाज वाचून उडेल झोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:34 IST2025-09-24T11:11:57+5:302025-09-24T11:34:23+5:30
Weird Rituals : या जमातीममध्ये केवळ महिलांची सुंदरता महत्वाची नसून पुरूषांना देखील सुंदर दिसणं महत्वाचं असतं.

Africa Unique Tribe: जगभरात वेगवेगळ्या जमाती राहतात आणि त्यांच्या अनेक परंपरा असतात. अशीच एक जमात म्हणजे वोडाबे. या समाजातील लोक आपल्या वेगळ्या जीवनशैली आणि पशुपालनासाठीच नाही तर पती चोरी करण्याच्या उत्सवासाठीही फेमस आहे. दरवर्षी हा उत्सव Gerewol नावाचे साजरा केला जातो. हा एक असा उत्सव असतो ज्यात पुरूष स्वत:ला सजवतात आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी नाचतात. या जमातीममध्ये केवळ महिलांची सुंदरता महत्वाची नसून पुरूषांना देखील सुंदर दिसणं महत्वाचं असतं.
वोडाबे समाजात नात्यांची सुरूवात नेहमीच महिलांकडून केली जाते. वर्षातून एकदा होणाऱ्या या उत्सवात पुरूष रंगीबेरंगी कपडे घालतात, चेहऱ्यावर कलर लावतात. ओठांवर काळा रंग लावतात आणि चेहरा लाल करतात.
या समाजात पुरूषांची सुंदरता ही महत्वाची बाब असते. म्हणजे उंची, पांढरे डोळे, मोठे दात, पातळ ओठ, मोठा जबडा. इतकंच नाही तर जे पुरूष हसताना डोळे फिरवू शकतात ते महिलांमध्ये सुपरस्टार मानले जातात.
आश्चर्याची बाब म्हणजे या उत्सवात महिला आधीच विवाहित असूनही दुसऱ्या पुरूषांना पसंत करू शकतात. काही महिला आपल्या पहिल्या पतीला सोडतात, तर काही दोन्ही पतींना सोबत ठेवतात. इतकंच नाही तर महिला कितीही पुरूषांसोबत संबंध ठेवू शकतात, जोपर्यंत त्यांना योग्य जोडीदार मिळत नाही.
या उत्सवाचं मुख्य आकर्षण Yaake डान्स असतो, ज्यात पुरूषांची लाइन लागलेली असते आणि महिला सगळ्यात सुंदर पुरूषाची निवड करतात. हा केवळ डान्स नसतो तर पुरूषांची एक सौंदर्य स्पर्धा असते. जी महिलांसाठी आयोजित केली जाते.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हा समाज बहुपत्नी आणि बहुपतीचाचा स्वीकार करते. जर एखादा पुरूष बाळाला जन्म देऊ शकत नसेल तर तो अपत्यासाठी आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत संबंध ठेवण्याची परवानगी देतो. मुलं सुंदर व्हावी यासाठी सुंदर पुरूषांसोबत संबंध ठेवण्याची मुभा असते.
वोडाबे समाजाकडे भरपूर पाळीव प्राणी असतात, ज्यांची ते खूप काळजी घेतात. हे जीव सामान्यपणे शाकाहारी असतात, जे बाजरी खातात किंवा दूध पितात. वोडाबे लोकांची भाषा Fula आहे, पण ते वाचू किंवा लिहू शकत नाहीत.
वोडाबे समाजातील लोक अजूनही बाहेरच्या जगापासून खूप दूर आहे. फार कमी पर्यटक त्यांचा हा उत्सव बघू शकतात. पण जेही तिथे जातात त्यांच्यासाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. आजही या जमातीने आपली परंपरा आणि रिवाज टिकवून ठेवले आहेत.