शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या मंदिरातील खांबांमधून येतो गाण्यांचा आवाज, रहस्य उलगडण्यासाठी इंग्रजांनी कापले होते स्तंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 4:56 PM

1 / 6
आज आम्ही विरूपाक्ष मंदिराच्या रहस्याबाबत सांगणार आहोत. भारतातील अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिरांपैकी हे मंदिर कर्नाटकातील हम्पीमध्ये आहे. अशी मान्यता आहे की, हम्पी रामायण काळातील किष्किंधा आहे. या मंदिरात भगवान शिवाच्या विरूपाक्ष रूपाची पूजा केली जाते. या मंदिराचा समावेश यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानातही केला जातो. या मंदिराच्या अनेक खासियत आहेत आणि अनेक रहस्यही आहेत. या मंदिराच्या रहस्यांना इंग्रजांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही.
2 / 6
भगवान विरूपाक्ष आणि त्यांची पत्नी देवी पंपा यांना समर्पित या मंदिराची खासियत म्हणजे येथील शिवलिंग दक्षिणेकडे झुकलेलं आङे. धार्मिक मान्यता आहे की, रावणाने भगवान रामासोबतच्या युद्धात विजयासाठी भगवान शिवाची आराधना केली. त्यानंतर भगवान शिव प्रकट झाले. तेव्हा रावणाने त्यांना लंकेत शिवलिंग स्थापन करण्यास सांगितलं.
3 / 6
रावणाने पुन्हा पुन्हा प्रार्थना केल्यावर भगवान शिव यासाठी तयार झाले. पण त्यांनी रावणासमोर एक अट ठेवली. अट ही होती की, शिवलिंग लंकेत नेत असताना खाली जमिनीवर ठेवायचं नाहीये. रावण शिवलिंग घेऊन जात होता, पण रस्त्याने त्याने शिवलिंग पकडण्यासाठी एका व्यक्तीकडे दिलं. पण वजन जास्त असल्याने त्या व्यक्तीने शिवलिंग जमिनीवर ठेवलं. तेव्हापासून हे शिवलिंग इथेच आहे आणि हजारो प्रयत्न करूनही जागेवरून बाजूला करता आलं नाही.
4 / 6
विरूपाक्ष मंदिराच्या भींतीवर या घटनेचे चित्र बनवले आहेत. यात दाखवण्यात आलं आहे की, रावण भगवान शंकराकडे पुन्हा शिवलिंग उचलण्यासाठी प्रार्थना करत आहे. पण भगवान शिव यांनी नकार दिला. मान्यता अशीही आहे की, हे ठिकाण भगवान विष्णुचं निवासस्थान होतं. पण हे ठिकाण राहण्यासाठी त्यांना जास्त मोठं वाटलं मग ते क्षीरसागरला गेले.
5 / 6
असं सांगितलं जातं की, हे मंदिर साधारण ५०० वर्ष जुनं आहे. द्रविड स्थापत्य कलेत तयार मंदिराचा गोपुरम ५०० वर्षाआधी बनला होता जो ५० मीटर उंच आहे. भगवान शिव आणि देवी पंपासोबतच इथे अनेक छोटी मंदिरे आहेत. विक्रमादित्य द्वितीयच्या राणी लोकमाह देवीने विरूपाक्ष मंदिर बनवलं होतं. या मंदिराला पंपावती मंदिर या नावानेही ओळखलं जातं.
6 / 6
या मंदिराची सर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, या मंदिराच्या काही खांबांमधून संगीत म्हणजेच गाण्यांचा आवाज येतो. त्यामुळे त्यांना म्युझिकल पिलर्सही म्हटलं जातं. असं सांगितलं जातं की, इंग्रजांनी या खांबांमधून संगीत कसं ऐकायला मिळतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी या मंदिराचे खांब तोडून पाहिले, तेव्हा त्यांना दिसलं की, खांब तर पोकळ आहेत. त्यात काहीच नाही. या रहस्याबाबत आजपर्यंत समजू शकलेलं नाही.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सKarnatakकर्नाटकhistoryइतिहासJara hatkeजरा हटके