हुंडाई क्रेटाची एकमेव मालकीण; ३ कोटींचे घर असूनही रस्त्यावर लावते स्टॉल, ‘ती’ची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 11:17 AM2020-07-12T11:17:44+5:302020-07-12T11:32:55+5:30

मेहनत करून पैसे कमावणं आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगणं असं प्रत्येकाचचं स्वप्न असतं. तुम्हालाही आपापल्या क्षेत्रात काम करताना विशिष्ट उंचीवर पोहोचण्याची इच्छा मनात असेल. आज तुम्हाला कोट्यावधींची संपत्ती असतानाही रसत्यावर स्टॉल लावत असलेल्या एका महिलेबाबत सांगणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही 3 कोटींच्या घरात राहूनही ही महिला रस्त्यावर स्टॉल लावून अन्न पदार्थ विकते.

या महिलेचं नाव उर्वशी यादव असं आहे. ही महिला आपल्या कुटुंबासोबत 3 कोटींच्या घरात राहते. इतकंच नाही तर या महिलेकडे एसयुव्ही गाडी सुद्धा आहे.

इतकी संपत्ती असूनही ही महिला रस्त्यावर खाद्यपदार्थांची गाडी लावून ते पदार्थ विकते. त्यांच्या या लहानश्या दुकानाचं नाव छोले कुल्चे असे आहे.

कुटुंबाच्या भविष्याकरीत्या त्यांनी हा निर्णय घेतला. एका दुर्घटनेत त्यांचे पती खूप जखमी झाल्यामुळे त्यांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला होता. या घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट आले. अश्यात डॉक्टरांनी सहा महिन्यानंतर हिप रिप्लेसमेंट सांगितल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसै उभे करावे लागणार होते. म्हणून त्यांनी स्वतः काम करण्याचं ठरवलं.

काहीकाळ उर्वशी यांनी नर्सरीत मुलांना शिकविण्याचे काम केलं पण त्यातून येणार मिळकत ही तुटपुंजी होती. म्हणून त्यांनी नवं काही करण्याचा निर्णय घेतला.

उर्वशी यांनी माध्यमांना सांगितले की, ''आज माझी आर्थीक परिस्थिती चांगली असली तरी भविष्यकाळातील गोष्टी विचारात घेऊन मी मला हे काम आनंदानं करते. मला जेवण बनवायची आवड असलेल्या या आवडीला मी व्यवसायाचे रुप देण्याचा प्रयत्न केला. माझे पती अमित यादव हे एका प्रसिद्ध कंपनीत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सासरे हे भारतीय वायू सेनेत सेवा निवृत्त विंग कमांडर आहे. ३१ मे २०१६ रोजी अमित यादव सेक्टर १७ अ मध्ये पडले. डॉक्टरांनी डिसेंबर महिन्यात एक सर्जरी करण्यास सांगितलं. ह्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी सेक्टर १४ च्या एका झाडाखाली दुकान लावण्यास सुरुवात केली.''

उर्वशी यांना यश मिळण्यासाठी अनेकदा संघर्षाचा सामना करावा लागला. दुकान लावण्याच्या निर्णयाला घरातून विरोध होता. कारण उर्वशी या उच्च शिक्षित आहेत. पण आपली आवड आणि कुटुंबावर आलेलं आर्थिक संकट याचा विचार आधी केला.

महिंद्रा स्कॉर्पिओ आणि हुंडाई क्रेटाची मालकीण रस्त्यावर दुकान लावणार तर विरोध होणं हे स्वाभाविकचं आहे. त्यांना एक रेस्टॉरंट उभारण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. जर महिलांनी कोणतेही काम करायचं ठरवलं तर कितीही संकटं येवोत त्यांचा सामना करण्यासाठी महिला समर्थ असतात. असेही त्या म्हणाल्या.

(image credit-daily.bhaskar.com, India.com, india today, hindustantimes.com)

Read in English