हुबेहुब मानवी चेहऱ्याप्रमाणे दिसणारा दुर्मिळ मासा कॅमेरात कैद; पाहा व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 17:17 IST2020-07-11T16:58:32+5:302020-07-11T17:17:28+5:30

समुद्रात वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. काही मासे माणसांना सहजगत्या दिसतील असे असतात. तर काही दुर्मीळ जीव माणसांच्या दृष्टीस पडणं जवळजवळ अशक्यचं असतं.
काही माश्यांच्या सौदर्यांची तुलना कशाशीही केली जाऊ शकत नाही. समुद्रातील दुर्मीळ जीव सगळ्यांच्या दृष्टीस पडणं ही बाब आश्यर्यकारक समजली जाते.
या माश्याला पाहून लोक आणि वैज्ञानिक चकित झाले आहेत. याचं कारण म्हणजे या माश्याचे ओठ माणसांच्या ओठांप्रमाणे दिसत आहेत.
या माश्याला ट्राइगरफिश असे नाव देण्यात आले आहे.
साधारणपणे दक्षिण आशियाई देशात असे मासे दिसून येतात. त्यांचे जबडे खूपच मजबूत असतात. माणसांप्रमाणे ओठ आणि दात असलेला मासा पाहून लोक चक्रावले आहेत.
ट्विटरवर या असामान्य माश्याच्या फोटोवर अनेक कार्टून्स तयार केले जात आहे.
फोटोशॉपचा वापर करून माश्याचा लुक बदलला जात आहे. गेल्या काही दिवसात हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.