शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात नशीब! आकाशातून मौल्यवान दगडांचा पाऊस, रातोरात गावातील लोक झाले लखपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 3:52 PM

1 / 10
नेहमीच आकाशातून मौल्यवान दगड किंवा उल्कापिंड पृथ्वीवर पडत असतात. पण यात एवढं काही खास नसतं ज्याकडे लक्ष जावं. हे दगड वैज्ञानिक रिसर्चसाठी घेऊन जातात. काही लोक हे दगड एलियनचं गिफ्ट समजून घरात सजवून ठेवतात. ब्राझीलच्या एका गावात उल्कापिंडाचे शेकडो तुकडे पडले. या उल्कापिंडाच्या प्रत्येक तुकड्याची किंमत लाखो रूपये सांगितली जात आहे. यातील सर्वात मोठ्या तुकड्याची किंमत १९ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. (AllImage Credit : Charles Araujo)
2 / 10
ब्राझीलमधील गाव सॅंटा फिलोमेनामध्ये १९ ऑगस्टला उल्कापिंडाच्या तुकड्यांचा पाऊस झाला. येथील लोक याला पैशांचा पाऊस म्हणत आहेत. कारण येथील लोकांनी हे तुकडे जमा करून ठेवले आहेत. आता वैज्ञानिकांनी या दगडांची टेस्ट केली तेव्हा त्यांना हे दगड अमूल्य असल्याचं समजलं. वैज्ञानिकांनी लोकांकडे हे दगड मागितले तर लोकांनी त्या बदल्यात पैशांची मागणी केली. जास्तीत जास्त लोकांनी लाखो रूपयांची कमाई केली सुद्धा.
3 / 10
४० किलोग्रॅम वजनी सर्वात मोठ्या तुकड्याची किंमत २६ हजार डॉलर आहे. म्हणजे साधारण १९ लाख रूपये. असे सांगितले जात आहे की, सॅंटा फिलोमेनामध्ये छोटे-मोठे मिळून २०० पेक्षा जास्त तुकडे पडले आहेत. हे तुकडे अशा उल्कापिंडाचे आहेत जे सौर मंडल तयार होतानाच्या काळातील आहे. या तुकड्यांमुळे अंतराळातील अनेक रहस्यांवरून पडदा उठू शकतो.
4 / 10
वैज्ञानिकांनी सांगितले की, असे केवळ १ टक्का उल्कापिंड असतात जे लाखो रूपये किंमतीत विकले जातात. ब्राझीलच्या या गावातील लोक फार गरीब आहेत. ज्यांनाही हे दगड मिळाले ते रातोरात श्रीमंत झालेत. २० वर्षीय एडिमार डा कोस्टा रॉड्रिग्सने सांगितले की, त्या दिवशी आकाशात सगळीकडे धूर होता. मग मला मेसेज आला की, आकाशातून दगड पडत आहेत.
5 / 10
असे मानले जात आहे की, हा उल्कापिंड साधारण ४.६ बिलियन वर्ष जुना आहे. हा फार दुर्मीळ उल्कापिंड आहे. याची किंमत हजारो पाऊंडमध्ये असते. साओ पाओलो यूनिव्हर्सिटीतील गेब्रिएल सिल्वा यांनी सांगितले की, सोलर सिस्टीम ज्या खनिजापासून तयार झाली ही उल्कापिंड त्यापासूनच तयार झाल्याची शक्यता आहे.
6 / 10
स्थानिक लोकांना अशी माहिती मिळाली की, त्यांच्या गावात आकाशातून जे पडलं ते फार मूल्यवान आहे. ते याला आकाशातून पडलेली कॅश म्हणत आहेत. एडिमार कोस्टा रॉड्रिग्सला सात सेंटीमीटरचा दगड सापडला याचं वजन १६४ ग्रॅम होतं. हा दगड विकून तिने ९७ हजार रूपये कमावले.
7 / 10
चर्चमध्ये लोक म्हणत होते की, देवाने आमच्यासाठी पैशांचं गाठोडं उघडलं आहे एका व्यक्तीन २.८ किलोग्रॅमचा दगड विकून १४.६३ लाख रूपये कमावले. रॉड्रिग्सने सांगितले की, या गावातील ९० टक्के लोक शेतकरी आहेत. इथे फार दुकाने नाहीत. लोकांना आधार देण्यासाठी आकाशातून हा पाऊस झाला.
8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :Brazilब्राझीलscienceविज्ञानJara hatkeजरा हटके