Donald Trump ज्या सूटमध्ये राहणार तो पाहायचाय?; एका रात्रीची भाडं 'फक्त'....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 13:51 IST2020-02-24T13:36:38+5:302020-02-24T13:51:35+5:30
महत्वाची बाब म्हणजे तब्बल ४,६०० चौरस फूट क्षेत्राच्या या सूटची एका रात्रीची किंमत आठ लाख रुपये इतकी आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात मोठ्या जल्लोषात स्वागत झालं आहे. ते पत्नी मेलेनिया यांच्यासोबत अहमदाबादला पोहोचले. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे कुठे थांबणार याचीही लोकांमध्ये उत्सुकता बघायला मिळत आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे दिल्लीतील मौर्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. ज्या सूटमध्ये राहणार आहेत तो चाणक्य सूट अतिशय आलिशान आहे.
अन्न प्रयोगशाळा, सुसज्ज सुरक्षा व्यवस्था, आलिशान सुविधा, खासगी रूम, स्पा, जीम अशा नानाविध सुविधा या चाणक्य सूटमध्ये आहेत.
दिल्लीतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता या हॉटेलमध्ये हवेची गुणवत्ता नियंत्रित करणारी अत्याधुनिक यंत्रे लावण्यात आली आहेत.
दोन बेडरूमचा चाणक्य सूट आहे. या सूटला खासगी अभ्यागत कक्ष, खासगी टेरेस, जीम, डायनिंग हॉल, खासगी प्रवेश व्यवस्था, वेगवान सरकते जिने आदी सुविधा आहेत.
लाकडी टाइल्स, वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती असलेल्या भिंती, नावीन्यपूर्ण स्वागतकक्ष, प्रशस्त बाथरूम, छोटेखानी स्पा, जिम यांनी हा सूट सजलेला आहे. ५५ इंचाचा टीव्ही, आयपॉड डॉकिंग स्टेशन, अत्याधुनिक उपकरणे येथे सज्ज आहेत.
महत्वाची बाब म्हणजे तब्बल ४,६०० चौरस फूट क्षेत्राच्या या सूटची एका रात्रीची किंमत आठ लाख रुपये इतकी आहे.
या सूटमध्ये डोनाल्ड आणि त्यांच्या पत्नी मेलानिया हे राहणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची कन्या इवांका आणि जावई जारेड कुश्नेर हे सुद्धा असणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळही राहणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी साबरमती येथील आश्रमाला भेट दिली.
त्यानंतर ते जगातल्या सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियममध्ये गेले आणि नागरिकांशी संवाद साधला.