शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OMG! तिरूपती बालाजी मंदिरात भाविकाने दान दिली ६.५ किलोची सोन्याची तलवार, बघा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 4:41 PM

1 / 7
आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिरात दररोज लोक कोट्यावधी रूपयांचं दान देतात. सोनं-चांदीचे दागिने दान देतात. सोमवारी हैद्राबादच्या श्रीनिवास दाम्पत्याने १.८ कोटी रूपयांची एक सोन्याची तलवार मंदिरात दान केली आहे.
2 / 7
श्रीनिवासन दाम्पत्याने सोमवारी सकाळी तिरूमाला तिरूपती मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे ही तलवार सोपवली. श्रीनिवास दाम्पत्याने रविवारी तिरूमालाच्या कलेक्टिव गेस्ट हाउसमध्ये मीडियासमोर साडे सहा किलोग्रॅमची सोन्याची तलवार दाखवली. असं सांगितलं जात आहे की, श्रीनिवास यांना गेल्यावर्षापासून ही तलवार इथे दान करायची होती. पण कोरोनामुळे ते जमू शकलं नव्हतं.
3 / 7
भगवान वेंकटेश्वर स्वामी यांच्या चरणी सोन्याची तलवार अर्पण करणारे श्रीनिवास म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून मला सोन्याची तलवार 'सूर्य कटारी' दान करायची होती. पण कोरोनामुळे मंदिर बंद होतं. आज सकाळी ते शक्य झालं.
4 / 7
असं सांगितलं जात आहे की, ही तलवार तयार करण्यासाठी ६ महिन्यांचा वेळ लागला. साडे सहा किलोची सोन्याची तलवार बनवली गेली तेव्हा याची किंमत साधारण १.८ कोटी रूपये इतकी होती. आता याची किंमत साधारण ४ कोटी रूपये आहे.
5 / 7
याआधी तामिळनाडूच्या टेनीतील प्रसिद्ध कपडे व्यापारी थंगा दोराई यांनी २०१८ मध्ये तिरूपती मंदिरात १.७५ कोटी रूपयांची सोन्याची तलवार दान केली होती. ही तलवार तयार करायला सहा किलो सोनं लागलं होतं.
6 / 7
आंद्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात असलेल्या तिरूमलाच्या डोंगरावर असलेलं श्री वेंकटेश्वर मंदिर एक प्रसिद्ध देवस्थान आहे. इथे हजारो भाविक रोज दर्शनाला येतात. तिरूपती श्रीवेंकटेश्वर मंदिर भारतातील दुसरं सर्वात श्रीमंत मंदिर आहे. इथे कोट्यावधी रूपये दान केले जातात.
7 / 7
आंद्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात असलेल्या तिरूमलाच्या डोंगरावर असलेलं श्री वेंकटेश्वर मंदिर एक प्रसिद्ध देवस्थान आहे. इथे हजारो भाविक रोज दर्शनाला येतात. तिरूपती श्रीवेंकटेश्वर मंदिर भारतातील दुसरं सर्वात श्रीमंत मंदिर आहे. इथे कोट्यावधी रूपये दान केले जातात.
टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटJara hatkeजरा हटके