भारतातील 'या' सुंदर ठिकाणावर भारतीयांनाच जाण्यास आहे बंदी, पाय जरी ठेवला तरी जीव गेलाच समजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:28 IST2026-03-19T12:53:17+5:302026-03-19T13:28:26+5:30
Interesting Facts : जर कुणी इथे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याना आपला जीव गमवावा लागू शकतो. हे ठिकाण म्हणजे नॉर्थ सेंटिनल बेट. जे कितीतरी वर्षांपासून आपल्या रहस्यासाठी आणि खतरनाक स्थितींसाठी चर्चेत राहतं.

भारतातील नैसर्गिक सौंदर्य आणि येथील संस्कृती बघण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. पण आपल्याला माहीत नसेल की, भारतातील अशी अनेक ठिकाणं आहेत, जे सुंदर असूनही लोक तिथे पोहोचू शकत नाहीत. भारतात एक असं ठिकाण आहे जिथे भारतीयच जाऊ शकत नाहीत. जर कुणी इथे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याना आपला जीव गमवावा लागू शकतो. हे ठिकाण म्हणजे नॉर्थ सेंटिनल बेट. जे कितीतरी वर्षांपासून आपल्या रहस्यासाठी आणि खतरनाक स्थितींसाठी चर्चेत राहतं.

नॉर्थ सेंटिनल बेट हे अंदमान आणि निकोबारमध्ये अंदमान समुद्राच्या मधे आहे. पोर्ट ब्लेअरपासून हे बेट साधारण ३६ किलोमीटर अंतरावर आहे. तर या बेटाचं क्षेत्रफळ ६० ते ७२ वर्ग किलोमीटर आहे. हे बेट घनदाट जंगल आणि नैसर्गिक संपत्तीने भरलेलं आहे. पण इथे जाण्यास बंदी आहे.

आपल्या माहीत नसेल की, भारत सरकारने या बेटाला आदिवासी आरक्षित क्षेत्र घोषित केलं आहे. इथे राहणारे सेंटिनली जमातीचे लोक जगापासून पूर्णपणे वेगळे राहतात. येथील लोक बाहेर कोणत्याही व्यक्तीला आपल्या क्षेत्रात येऊ देत नाहीत. कुणी दिसलं तर त्यांच्यावर लगेच हल्ला करतात.

याच कारणाने सरकारने इथे जाण्यावर बंदी घातली आहे. कारण बाहेरच्या लोकांच्या संपर्कात आल्याने येथील लोक आजारांचे शिकारही होऊ शकतात. ज्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे या बेटाच्या जवळ जाणं बेकायदेशीर आहे.

नॉर्थ सेंटिनल बेटाला जगातील सगळ्यात खतरनाक ठिकाणांमध्ये गणलं जातं. इथे अनेकदा काही लोकांवर हल्ले झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. २०१८ मध्ये जॉन एलन चाऊ नावाच्या एका अमेरिकन मिशनरीची सेंटिनली लोकांनी हत्या केली होती. तो त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता.

त्याआधी २००६ मध्ये दोन भारतीय मच्छिमार इथे पोहोचल्यावर मारले गेले होते. या घटनांनंतर सरकारने नियम आणखी कठोर केले आणि विना परवानगी तिथे जाणं गंभीर गुन्हा मानला जातो.

इथे राहणारी आदिवासी जमात जगापासून वेगळी आणि प्राचीन समुदायांपैकी एक मानली जाते. असंही मानलं जातं की, त्यांचे पूर्वज हजारो वर्षाआधी इथे येऊन राहत होते आणि ते आजही त्यांची जुनी जीवनशैली फॉलो करतात.

या बेटावर राहणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. ते शिकार, मासे पकडणे आणि जंगलातील गोष्टींवर अवलंबून राहतात. धनुष्य-बाण, भाल्यांचा वापर करतात. ते बाहेरच्या लोकांना त्यांच्यासाठी धोका मानतात.

















