जगातील कोणत्या देशात आहेत सर्वाधिक विमानतळं? आकडा वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:40 IST2025-11-05T12:03:41+5:302025-11-05T13:40:55+5:30
Most Airport Country : आपल्याला माहीत आहे का की, जगातील कोणत्या देशात सगळ्यात जास्त विमानतळं आहेत? कदाचित माहीत नसेल. तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

विमानानं प्रवास करणं आजकाल खूपच सोपं झालं आहे. कारण टेक्नॉलॉजी चांगलीच वाढली आहे. कमी वेळात एकाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर विमान खूप फायदेशीर ठरतं. बऱ्याच लोकांसाठी विमानानं प्रवास करणं स्टेटस ठरतं. भारतातही अनेक विमानतळं आहेत जेथून लोक रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. पण आपल्याला माहीत आहे का की, जगातील कोणत्या देशात सगळ्यात जास्त विमानतळं आहेत? कदाचित माहीत नसेल. तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

अमेरिका हा जगातील सगळ्यात विमानतळं असणारा देश आहे. या देशाकडे जगातील सर्वाधिक म्हणजेच 16,000 हून अधिक विमानतळ आहेत. म्हणजे जमिनीपासून आकाशापर्यंत सर्वात मोठं कनेक्टिव्हिटी नेटवर्क अमेरिकेकडेच आहे.

WION या वेबसाईटच्या अहवालानुसार, अमेरिकेत सुमारे 16,116 विमानतळ आहेत, ज्यांतून व्यापारी, खासगी आणि लष्करी अशा सर्व प्रकारच्या उड्डाणांची सोय आहे. म्हणजे जगात सगळ्यात जास्त विमानतळ अमेरिकेती आहेत.

अमेरिकेचा भूभाग प्रचंड मोठा आणि लोकसंख्या विविध असल्यामुळे एवढं मोठं नेटवर्क तिथं आवश्यकही आहे. CIA.gov च्या अहवालानुसार, हे विमानतळ व्यवसाय, वाहतूक आणि संरक्षण या तिन्ही क्षेत्रांसाठी महत्त्वाचे ठरतात.

जगातील सर्वाधिक विमानतळ असलेले देश अमेरिका 16,116 विमानतळ, त्यानंतर ब्राझील 5,297 विमानतळ. ब्राझीलचा प्रचंड आकार आणि काही दुर्गम भागांमुळे इथे छोटे-छोटे विमानतळ लोकांना जोडण्यासाठी आवश्यक ठरले आहेत.

नंतर नंबर लागतो तो ऑस्ट्रेलियाचा, इथे 2,257 विमानतळ आहेत. कमी लोकसंख्या असूनही मोठ्या भूभागामुळे स्थानिक विमानतळ इथल्या पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहेत. मेक्सिको 1,580 विमानतळ यातील काहीच व्यावसायिक विमानतळ असले तरी ही संख्या देशाच्या हवाई संपर्काचे महत्त्व दर्शवते.

कॅनडा 1,459 विमानतळ. बर्फाळ आणि दुर्गम भागांसाठी विमान प्रवास इथे अत्यावश्यक आहे. कॅनडाचं विमान नेटवर्क देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांसाठी उपयुक्त ठरतो. फ्रान्स 1,218 विमानतळ. युनायटेड किंगडम 1,057 विमानतळ. पॅरिसचं चार्ल्स द गॉल आणि लंडनचं हीथ्रो विमानतळ जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी आहेत.

तर भारतामध्ये सध्या सुमारे 487 विमानतळ आणि एअर स्ट्रिप्स आहेत, त्यापैकी सुमारे 147 विमानतळांचे संचालन एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) करते. पाश्चात्य देशांच्या तुलनेत ही संख्या कमी असली, तरी गेल्या काही वर्षांत यात लक्षणीय वाढ झाली आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ 74 सक्रिय विमानतळ होते, तर आता ती संख्या 150 पेक्षा जास्त झाली आहे.

















