शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत, जगातील विचित्र स्मारकं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 3:21 PM

1 / 6
जगभरात अनेक महान व्यक्तींची स्मारकं उभारण्यात आली आहेत. याचबरोबर, तुम्हाच्या आठवणीत राहतील अशा काही कलात्मक अन् वैविध्यपूर्ण प्रतिकृती पाहायला मिळतील. अशाच काही कलाकृतींची माहिती आपण पाहूया.
2 / 6
व्हिक्टोरियाच्या सरकारी लायब्ररीसमोर एक लायब्ररी दिसून येते. ही लायब्ररी पाहिल्यानंतर पर्यटकांना आश्चर्य वाटते, कारण लायब्ररी याठिकाणी जमिनीत गेल्याची दिसते. मात्र, वास्तवात तसे नाही आहे.
3 / 6
1761मध्ये स्कॉटलँडमधील डनमोर शहरातील गव्हर्नरने आपल्यासाठी समरहाऊसची निर्मिती केली. त्यांना फळे आवडत होती. त्यावेळी स्कॉटलँडमध्ये अननस या फळाला जास्त महत्व होते. त्यांनी आपले घर अननस या फळाच्या डिसाईनमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला.
4 / 6
चेक गणराज्यच्या प्राग शहरात तुम्हाला एका फ्लॅगपोलला एक माणूस लटकलेला दिसतो. दरम्यान, लटकलेल्या माणसाची प्रतिकृती ही सिगमंड फ्रेड नावाच्या एका न्युरोलॉजिस्टची आहे. डेव्हिड कर्नी नावच्या मूर्तिकाराने तयार केली आहे.
5 / 6
दक्षिण अमेरिकेत मारियो इराजाबोल नावच्या एका मूर्तिकाराने विशाल हाताची निर्मिती केली. हा हात 11 मीटर लांब आहे. पर्यटक हे दृष्य पाहण्याठी मोठ्या प्रमाणात येतात.
6 / 6
ग्रेनाइडच्या सहा मोठ्या तुकड्यांचा वापर करुन 1980 मध्ये जॉर्जियाचे गाइडस्टोन तयार करण्यात आले. या दगडांवर आठ भाषांमध्ये मानव जातीसाठी निर्देश लिहिले आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके