By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 15:01 IST
1 / 7सामान्यपणे लोक लग्न एकाच नवरीशी करतात. पण असं कमीच ऐकायला मिळतं की, नवरदेवाने एकाच मंडपात दोन नवरींसोबत लग्न केलं. अशी एक घटना तेलंगनातून समोर आली आहे. इथे एका पुरूषाने दोन महिलांसोबत लग्न केलं आणि मोठ्यांकडून आनंदाने आशीर्वादही घेतले.2 / 7हे अनोखं लग्न याच महिन्याच्या १४ तारखेला उत्नूर अंचलच्या घनपूर गावात झालं. सध्या जिल्ह्यात या लग्नाचीच चर्चा रंगली आहे. ज्या पुरूषाने दोन महिलांसोबत लग्न केलं त्याचं नाव अर्जून आहे.3 / 7मीडिया रिपोर्टनुसार, वी. अर्जुन एकाचवेळी दोन महिलांच्या प्रेमात पडला. ज्यानंतर त्याने दोघींसोबतही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याच्या दोन्ही प्रेयसीही तयार झाल्या.4 / 7हे अनोखं लग्न बघण्यासाठी संपूर्ण गाव जमा झालं होतं. बीएडची डिग्री घेतल्यानंतर वी अर्जुन स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. अशात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरूणी उषाराणी आणि सुरेखा यांच्याशी प्रेम झालं.5 / 7गेल्या चार वर्षापासून तो दोघींना डेट करत होता. सगळं काही ठीक सुरू होतं. पण अडचण तेव्हा झाली जेव्हा अर्जुनच्या परिवाराने त्याला लग्न करण्यास सांगितले.6 / 7त्याला दोन्हीपैकी एकाही प्रेयसीला सोडायचं नव्हतं. त्यामुळे त्याने देन्ही तरूणींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत सुरूवातीला अर्जुनच्या घरच्यांना काहीच कल्पना नव्हती.7 / 7मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही तरूणींच्या परिवारातील लोक एका नवरदेवासोबत त्याचं लग्न लावून देण्यास तयार झाले. बॅंड बाजा वाजवत नवरी-नवरदेवाच्या मूळ गावी हे लग्न झालं. स्थानिक लोकांनी सांगितलं की, हे असामान्य प्रकरण नाही. अशाप्रकारची लग्ने आदिवासी समुदायात होत असतात.