सापांना तर कान नसतात, मग ते बासरीच्या सुरांवर 'नागिन डान्स' कसा करतात? सत्य समजल्यावर बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:27 IST2026-02-24T15:02:36+5:302026-02-24T15:27:20+5:30

Snake Facts : फार पूर्वीपासून वेगवेगळे सिनेमे म्हणा किंवा जत्रेतील गारूड्याच्या खेळांमधून म्हणा हेच दाखवण्यात आलं आहे की, साप बासरीच्या सुरांवर डोलतो. पण मुळात सापांना कानच नसतात. मग सापाला बासरीचा आवाज जातो तरी कसा?

Snake Facts: सापांना जगातील सगळ्यात भयानक जीवांपैकी एक मानलं जातं. जगात सापांच्या अनेक प्रजाती आहे. यातील काही विषारी असतात, तर काही बिनविषारी. फार कमी साप विषारी असतात. पण तरीही लोक सापांना खूप घाबरतात. सापांमध्ये लोकांमध्ये अनेक गैरसमजही असतात. फार पूर्वीपासून वेगवेगळे सिनेमे म्हणा किंवा जत्रेतील गारूड्याच्या खेळांमधून म्हणा हेच दाखवण्यात आलं आहे की, साप बासरीच्या सुरांवर डोलतो. पण मुळात सापांना कानच नसतात. मग सापाला बासरीचा आवाज जातो तरी कसा?

सापांबाबत मानवांमध्ये बरीच जिज्ञासा असते. सापांबाबत त्यांना वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता अधिक असते. त्यांच्या शांत हालचाली, विषारी दंश आणि रहस्यमय व्यवहार या गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. पण तरीही सापांबाबत अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांबाबत लोकांना माहीत नसतं.

आपण नागिन डान्सबाबत तर ऐकलंच असेल, लोकांना लग्नाच्या वरातीतही काहींना नागिन डान्स करताना पाहिलं असेल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की, साप बासरीच्या सुरांनी मोहित होऊ डान्स करू लागतात म्हणजे डोलू लागतात. पण सापांना कानच नसतात.

सापांना कान नसतात म्हणजे ते इतर काही जीवांसारखे आवाज ऐकू शकत नाही. मग साप बासरीच्या सुरांवर कसे डोलतात? यामागचं जे तथ्य आहे जे काहीतरी वेगळंच आहे. वैज्ञानिक तथ्यांच्या आधाराने समजून घ्यायचं तर सापांचं डोलणं म्हणजे एकप्रकारची प्रतिक्रिया आहे.

हा विषय बऱ्याच वर्षांपासून लोकांच्या उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे. पाहिल्यावर असं वाटतं की, साप एखाद्या व्यक्तीने वाजवलेल्या बासरीच्या सुरांवर लयबद्ध पद्धतीने आपला फणा डोलवतो. ज्याला आपण डान्स म्हणतो. पण यामागे एक वैज्ञानिक शाखा आहे.

मुळात साप कोणताही आवाज ऐकू शकत नाहीत. याचा अर्थ हा आहे की, राग किंवा सूर नाही तर ते विशेष भावनेच्या आधारावर प्रतिक्रिया देतात. सापांची खासियत ही आहे की, ते माती किंवा भांड्यांमधून उत्पन्न कंपणाला फार स्पष्टपणे फिल करू शकतात. हे कंपण त्यांना जबडा आणि हाडांमध्ये जाणवू शकतं.

जेव्हा गारूडी बीन वाजवणं सुरू करतो तेव्हा याचं कंपण जमिनीत पसरतं. सापाला या कंपणाची जाणीव होते आणि यावर प्रतिक्रिया म्हणून आपलं डोकं हलवणं सुरू करतो. त्याची हालचाल बघून आपल्याला वाटतं की, तो डान्स करत आहे.

त्याशिवाय साप गारूड्याच्या हालचालीला बघतो. खासकरून बीन गोल फिरवण्याच्या पद्धतीकडे साप बघतो. त्यानुसार साप हालचाल करतो. पण त्याला डान्स म्हणता येणार नाही. साप बासरीच्या आवाजावर डोलत नसतो तर तो कंपणाला प्रतिक्रिया देत असतो. हेच सत्य आहे.