तुमच्या सोबत राहत नसलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध बेकायदेशीर, असं करणं पडेल महागात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:01 PM2020-06-02T12:01:43+5:302020-06-02T12:10:56+5:30

Daily Mail च्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये 10 पैकी 6 लोकांनी लॉकडाउन सुरू झाल्यापासून शारीरिक संबंधच ठेवलेले नाहीत.

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउन लोकांचं जीवन कधीही कल्पना केली नसेल असं बदलून टाकलंय. आता हेच बघा ना लोकांच्या शारीरिक संबंधावरही अनेक निर्बंध, अनेक नियम समोर आले आहेत. Daily Mail च्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये 10 पैकी 6 लोकांनी लॉकडाउन सुरू झाल्यापासून शारीरिक संबंधच ठेवलेले नाहीत. 

कोरोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नसल्याने आणि सोशल डिस्टंसिंगचा नियम फॉलो केला जावा म्हणून यूके सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. या नियमानुसार, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही राहत नाहीत त्या व्यक्तीसोबत कुणाच्या घरी जाण्याला किंवा प्रायव्हेट ठिकाणावर जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.

सोपं करून सांगायचं म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तुम्ही राहत नाही त्या व्यक्तीसोबत तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. असं काही करणं आता इथे बेकायदेशीर ठरणार आहे. म्हणजे असं केलं तर तुम्हाला अटक होऊ शकते किंवा दंड भरावा लागू शकतो.

एका रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, यूकेतील केवळ 40 टक्के वयस्क लोक लॉकडाउनदरम्यान शारीरिक संबंध ठेवत होते. ही आकडेवारी फारच खाली आली असून लॉकडाउनमुळे लोकांचं लैंगिक जीवनही प्रभावित झाल्याचं दिसून येतं.

काही तज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला आहे की, त्यांनी लोकांना लॉकडाउनदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावं. कारण हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल असेल. पण हे करत असताना त्यांना कोरोनाची लागण होऊ नये याचीही काळजी घ्यावी.

दरम्यान दुसरीकडे डच सरकारने सिंगल लोकांना सल्ला दिला आहे की, लॉकडाउन दरम्यान सेक्शुअली अॅक्टिव राहण्यासाठी त्यांनीच पार्टनर शोधावे. जेणेकरून त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहील.

Read in English