शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चहाच्या टपरीवर माकड स्वच्छ करतोय कप-बशा, पाहून लोक म्हणाले, हा तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 4:51 PM

1 / 7
तुम्ही चहा नाश्त्याच्या दुकानामध्ये किंवा हॉटेलमध्ये कप, बशा धुणाऱ्या, भांडी घासणाऱ्या लोकांना पाहिले असेल. मात्र तुम्ही कधी माकडाला असे करताना पाहिले आहे का? मात्र सध्या सोशल मीडियावर अशा माकडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो अगदी माणसाप्रमाणे काम करतो. तसेच भांडी घासतो.
2 / 7
हा माकड एका चहाच्या दुकानामध्ये अगदी माणसांप्रमाणे भांडी धुण्याचे काम करतो. तसेच या माकडाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका व्यक्तीने सर्वप्रथम इंस्टाग्रामवर शेअर केला होता. प्रत्येकाला कठोर मेहनत करावी लागेल, असे हा व्हिडीओ शेअर करताना या हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले होते.
3 / 7
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातील ‘’अम्मी जान कहती थी की कोई भी धंधा छोटा नही होता और धंधेसे बडा कोई धर्म नही होता,’’ असा डायलॉगही ऐकता येतो.
4 / 7
व्हिडीओच्या सुरुवातीला एक चहाची टपरी दिसते. त्याच्या आसपास उभे असलेले लोक या माकडाला काम करताना कुतुहलाने पाहताना दिसत आहेत. तर तिथे बसलेला हा माकड पांढरी बशी पाण्याने भरलेल्या टबमध्ये बुडवतो आणि नंतर तिला साफ करतो.
5 / 7
एवढेच नाही तर व्हिडीओच्या अखेरीस माकड प्लेटचा वास घेतानाही दिसत आहे. या माकडाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील युझर्सच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. तसेच लोक त्यावर खूप मजेशीर कमेंट्सही करत आहेत.
6 / 7
एका सोशल मीडिया युझरने लिहिले की, दोन वेळच्या भाकरीसाठी माणसांनीही या माकडाप्रमाणे काम केले पाहिजे. एका अन्य व्यक्तीने लिहिले की, या महिन्याचा एम्प्लॉई ऑफ द मंथ हाच कर्मचारी असेल.
7 / 7
तसेच अनेक युझर्सनी ही बाब म्हणजे पशुसोबतचे क्रौय असल्याचे म्हटले आहे. तसेच या माकडाला अशाप्रकारे पकडून ठेवण्याच्या कृत्यावर टीकाही केली आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMonkeyमाकडIndiaभारत