हत्तीच्या विष्ठेपासून तयार केली जाते जगातील सगळ्यात महाग कॉफी, पाहा काय आहे या कॉफीची खासियत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:44 IST2026-01-22T16:15:09+5:302026-01-22T16:44:29+5:30
Elephant-Poop Coffee : एशिअन हत्तींना अरेबिका कॉफी चेरी खायला दिल्या जातात. नंतर त्याच्या विष्ठेतून बिया काढून साफ केल्या जातात आणि नंतर त्या भाजल्या जातात.

Elephant-Poop Coffee : आपण जर कॉफीचे शौकीन असाल तर माहीत असेल की, ब्लॅक आयव्हरी कॉफी जगातील सगळ्यात दुर्मीळ आणि महागडी कॉफी मानली जाते. ही कॉफी थायलॅंडच्या एका खास प्राणी संग्रहालयात तयार होते.

इथे एशिअन हत्तींना अरेबिका कॉफी चेरी खायला दिल्या जातात. नंतर त्याच्या विष्ठेतून बिया काढून साफ केल्या जातात आणि नंतर त्या भाजल्या जातात. त्यापासून कॉफी तयार केली जाते. ही कॉफी आपल्या वेगळ्या टेस्टसाठी ओळखली जाते.

इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टोकियोच्या वैज्ञानिकांनी या कॉफीच्या अनोख्या टेस्टचं कारण शोधून काढलं आहे. रिसर्चनुसार, ज्या हत्तींना कॉफी चेरी खायला दिल्या, त्यांच्या पोटात असे बॅक्टेरिया जास्त आढळले जे पेक्टिनला तोडतात.

पेक्टिन हे तेच तत्व आहे जे रोस्टिंग दरम्यान कडवटपणा निर्माण करतात. जेव्हा पेक्टिन आधीच तुटतो, तेव्हा कॉफी कमी कडवट होते.

रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, या हत्तींचे गट मायक्रोब्स जास्त वेगळे होते. म्हणजे त्यांच्या पोटात बॅक्टेरियाचं जीवन अधिक वेगळं होतं. वैज्ञानिकांचं असं मत आहे की, कॉफी चेरी खाल्ल्याने मायक्रोब्सना पचवण्याची संधी मिळते, ज्यामुळे कॉफी टेस्ट पूर्णपणे बदलते.

सहायक प्रोफेसर टकुजी यामाडा सांगतात की, या रिसर्चमुळे कॉफी प्रोसेसिंगचे नवे मार्ग उघडतील. मायक्रोब्सच्या मदतीने भविष्यात नवीन फ्लेवर आणि कमी कडवट असलेली कॉफी बनवली जाऊ शकते.

हा रिसर्च जर्नल Scientific Reports मध्ये प्रकाशित झाला आहे. यातून हे समोर आलं की, प्राण्यांचं डायजेशन आणि गट बॅक्टेरियामुळे कशाप्रकारे आपल्या अन्नाची टेस्ट बदलू शकते. कॉफीच्या विश्वात हा शोध गेम चेंजर ठरू शकतो.

















