कधीही पाहिलं नसेल 'असं' हॉटेल; मनात भीती दाटेल, पण मजा वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 08:04 IST2018-08-04T23:08:11+5:302018-08-06T08:04:19+5:30

दक्षिण अमेरिका खंडातील पेरुमध्ये एक हॉटेल तब्बल 1300 फूट उंचीवर आहे. अॅडव्हेंचर टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी या हँगिंग हॉटेलची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात.
डोंगराच्या कडेला असलेल्या हा हॉटेलमधून आसपासचं नेत्रदीपक सौंदर्य दृष्टीस पडतं. या हॉटेलच्या खोल्या कॅप्सूलच्या आकाराच्या आहेत. त्यांचा आकार 24 फूट लांब, 8 फूट रुंद आणि 8 फूट रुंद आहे. यामध्ये एक बाथरुम आणि डायनिंग रुम आहे.
हॉटेलच्या रुम पारदर्शक असल्यानं आसपासचा सुंदर निसर्ग पाहता येतो.
या रुममध्ये चार लॅम्प आहेत. ते सौरउर्जेवर चालतात.
या हॉटेलमधील एका खोलीचं दिवसभराचं भाडं 20 हजार रुपये आहे.