शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सलमान खानचं पेंटींगवेड तुम्हाला माहीत आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 4:25 PM

1 / 5
सलमान खानला फार पुर्वीपासून पेंटींगची फार आवड आहे. व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळेल तसा तो आपल्या या छंदाची पुर्तता करत असतो. त्याच्या या पेटींगमध्ये सर्वधर्मभाव दिसून येतो. एकाच फोटोत तुम्हाला वेगवेगळ्या धर्मांच्या देवांची प्रतिकं पाहायला मिळतील. सर्वधर्मभाव दाखवणाऱ्या या फोटोमधून सलमानचा दृष्टीकोमही दिसून येतो.
2 / 5
सलमान खानच्या काही पेंटींगमधून रोमान्सही दिसून येतो. या चित्रात तर 'हम दिल दे चुके सनम'ची एक झलकही दिसून येते.
3 / 5
त्याने अनेकांना आपली ही पेंटींग्स गिफ्ट केली आहेत. बॉलिवू़डपासून उद्योगपतींपर्यंत अनेकांना सलमानने ही पेंटींग दिली आहेत. आमीर खानच्या 'गझिनी'च्यावेळी त्याने त्या संजय सिंघानियाच्या लुकशी साधर्म्य असलेलं पेंटींग आमीरला देऊ केलं होतं.
4 / 5
आमीर खानसोबतच बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या घरीसुध्दा सलमान खानने आपल्या हाताने बनवलेली ही पेंटींग्स टांगलेली दिसतात. आपली पेटींग्स विकून मिळणारा पैसा तो चॅरीटीला देतो.
5 / 5
एकदा 'दस का दम' या सलमानच्या शोमध्ये 'बचना ए हसिनो' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त रणबीर कपूर, दिपीका पदुकोन आणि मिनीषा लांबा गेले होते. तेव्हा त्याने रणबीर कपूरला त्याच्या आजोबांचं म्हणजेच राज कपूर यांचं पेंटींग गिफ्ट केलं.
टॅग्स :Salman Khanसलमान खानRanbir Kapoorरणबीर कपूरDeepika Padukoneदीपिका पादुकोण